रस्ता दुरुस्तीसाठी `राष्ट्रवादी`ने केली टोल व्यवस्थापकांची आरती! 

नाशिक- पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंत रस्ताचे दुरवस्था झाली आहे. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. नाशिक सिन्नर टोलवेज कंपनीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका व्यवस्थापकांची आरती करीत आंदोलन केले.
NCP Toll
NCP Toll

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावर (Nashik-pune highway) सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंत रस्ताचे दुरवस्था (Road quality is inferior) झाली आहे. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. (many lost there life due to accident) नाशिक सिन्नर टोलवेज कंपनीचा (Nashik sinner tollways) निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक (NCP youth wing) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका व्यवस्थापकांची आरती करीत आंदोलन केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी आणि त्यांच्या  पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकांची हार घालून आरती केली. पुणे महामार्गावर टोल रोडवर ठिकठिकाणी खड्डे झाली आहेत. टोल वसुली जोरात सुरू आहेत, परंतु रस्ताची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. संबंधित व्यवस्थापकाला वेळोवेळी निवेदन दिले, परंतु दुरुस्ती केली जात नाही. 

या वेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष निखिल भागवत, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश टिळे, अनिल गायधनी, मनोज गायधनी, सूरज ठोंबरे, भगवान गायधनी, राजू टिळे, रूपेश गायधनी, विक्रम गायखे, शंकर सरोदे, सोनू ठोंबरे, प्रकाश तुंगार, दर्शन भागवत, अर्जुन करवर, संकेत देवरे, निखिल जाधव, रोहित अनवट, रामा अनवट, आदित्य बोराडे आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com