मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनपुर्ती; औरंगाबादेत `सारथी`साठी हक्काचे कार्यालय व वस्तीगृह

मुख्यमत्र्यांच्या सूचनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
Sarthi Office And Hostel- Cm Uddhav Thackeray News Aurangabad
Sarthi Office And Hostel- Cm Uddhav Thackeray News Aurangabad

औरंगाबाद ः मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारने किमान त्यांच्या अधिकारात जे आहे ते निर्णय तरी मराठा समाजासाठी घ्यावेत अशी मागणी होत होती. (Office and hostel for 'Sarathi' in Aurangabad) यात प्रामुख्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, सारथीचे जिल्ह्याजिल्ह्यात कार्यालये असावीत, यासह अनेक मुद्दे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती.

या मागणीला यश येतांना दिसत असून औरंगाबादेत सारथीचे कार्यालय व वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Maharashatra) मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनपुर्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे बोलले जाते. औरंगाबाद येथील तंत्र शिक्षण विभागाचे कार्यालयच सारथीसाठी देण्यात येणार आहे.

मुख्यमत्र्यांच्या सूचनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.(Gardian Minister Subhash Desai)  कालच सुभाष देसाई आणि अनेक मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची भेट झाली होती. (Higher Education Minister Uday Samant)  औरंगाबाद येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यालय व वसतीगृह सारथीसाठी देण्याच्या निर्णय आज घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेत सारथीसाठी कार्यालय व वसतीगृह देण्याच्या शब्द दिला होता. औरंगाबाद शहरातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सध्या बंद असलेले कार्यालय व वसतीगृह सारथीला देण्यात येणार असल्याचे उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

या विषयी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली होती. दरम्यान, या निमित्ताने सारथीच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com