मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच, सत्तार पोहचले दानवेंच्या घरी..

शिवसेनेचा कुठलाही निर्णय हा पक्षाचे प्रमुख म्हणून ते घेत असतात. आणि ते जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रातील शिवसैनिक, आमच्या सारखे लोकप्रतिनिधी सगळ्यांना मान्य असतो.
Abdul Sattar At Raoshaeb Danves House News Aurangabad
Abdul Sattar At Raoshaeb Danves House News Aurangabad

औरंगाबाद ः मंचावरील आजी-माजी आणि एकत्रित आले तर भविष्यातील सहकारी, असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. ठाकरेंच्या या विधानानंतर सर्वच राजकीय पक्षांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. (As soon as the Chief Minister turns his back, at the house of Sattar Danve) माजी मुख्यमंत्री फडणवीसांपासून राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर आपापली भूमिका मांडली.

औरंगाबादेतील आपले पुर्वनियोजित कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मुंबईला रवाना होत नाही तोच, त्यांना विमातळावरून सोडून राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले. (State Minister Abdul Sattar) प्रसार माध्यमांनी या दोघांनाही गाठत मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राज्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नांचा भडीमार केला. यावर दोघांनीही का नाही? असे म्हणत पुष्टी दिली.

रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात सध्या सत्तेवर असलेलं सरकारं हे जनतेने निवडून दिलेले नाही. (Central Railway Satate Minister Raosaheb Danve)  जनतेला शिवसेना-भाजपचं सरकार अपेक्षित होतं. पण उलटंच घडलं. दीड दोन वर्ष काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत काम केल्यानंतर कदाचित मुख्यमंत्र्यांना काही अनुभव आला असले आणि त्यातून त्यांनी आजच्या कार्यक्रमात भावी सहकारी असा उल्लेख केला असावा.

या संदर्भात केंद्रातील आमचे नेते व मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेऊ शकतील. मुख्यमंत्री आमचाच असला पाहिजे ही भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असणे स्वाभाविक आहे. सत्तार यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री पाहिजे तर मलाही वाटते तो आमच्या पक्षाचा असला पाहिजे. यात काही गैर नाही, पण जेव्हा राज्यातील आणि देशातील दोन्ही पक्षाचे मोठे नेते एकत्रित बसतील तेव्हा यावर जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल.

अठरा महिन्यांनी एकत्र आलो..

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे आणि मी अठरा महिन्यांनी एकत्र आलो असा दावा करत दानवे यांनी आपल्याला नाश्ता करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भाजपला एकत्रित येण्याचे केलेल्या आवाहनाचा अर्थ तुम्ही काॅंग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळलात असा होतो का? या प्रश्नावर सत्तार म्हणाले, अजिबात नाही, तीनही पक्षांचा सरकारमध्ये चांगला समन्वय आहे. आम्ही एकमेकांचा मान राखतो. त्यामुळे आम्ही या दोन पक्षांना कंटाळलो असा होत नाही.

पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे वक्तव्य केले, या मागे देखील काही राजकीय गणित असेल. शिवसेना भाजप सोबत जाईल की नाही? गेली तर उर्वरित तीन वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल का? या सगळ्यांचा निर्णय हा उद्धव ठाकरे घेतात. शिवसेनेचा कुठलाही निर्णय हा पक्षाचे प्रमुख म्हणून ते घेत असतात. आणि ते जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रातील शिवसैनिक, आमच्या सारखे लोकप्रतिनिधी सगळ्यांना मान्य असतो.

त्यामुळे भविष्यात शिवसेना-भाजप युती झाली तर आनंदच आहे, शेवटी गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही पक्ष एकत्रच होते. दोघांची हिंदुत्वाची भूमिका देखील सारखीच आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते एवढेच मी या निमित्ताने सांगतो, असे म्हणत सत्तार यांनी देखील युतीसाठी अनुकूलता दर्शवली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com