नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जातायेत..

गडकरी हेच असे मंत्री आहेत, जे देशातील इतर राज्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून आहेत.
Ashok chavan press conference news aurangabad
Ashok chavan press conference news aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय नितीन गडकरी यांच्या बाबतीत एवढेच म्हणावेसे वाटते, `राईट पर्सन, इन राॅंग पार्टी`, गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत, त्यांचे पंख छाटले जात आहेत, अशा शब्दात काॅंग्रेस नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी गडकरीबद्दलचे मत व्यक्त केले. (Nitin Gadkari is on the wrong side, his wings are being cut off, said minister Ashok chavan) केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी आज औंरंगाबादेतील पत्रकारांशी आॅनलाईन संवाद साधला.

यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कारभारावर कडाडून हल्ला चढवला. याचवेळी या सरकारमधील तुमचे आवडते मंत्री कोण? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याला उत्तर देतांना चव्हाण यांनी गडकरींची भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा दावा केला.

अशोक चव्हाण म्हणाले, मोदी सरकारच्या सात वर्षाचे मुल्यमापन करतांना एखादी चांगली गोष्ट सांगावी, असे काहीच नाही. वैयक्तिक म्हणाल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक आम्ही नेहमीच करत आलो आहोत. (We have always appreciated the work of Nitin Gadkari.) पण ते एनडीएचा भाग असल्यामुळे त्यांच्या कामाचे मुल्यमापन देखील सरकार म्हणूनच केले जाईल.

केंद्रातील मोदी सरकारची कार्यपद्धती पाहिली, तर एकमेव गडकरी हेच असे मंत्री आहेत, जे देशातील इतर राज्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून आहेत. केवळ भाजपच नाही तर विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधी नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत.

पक्षभेद न बाळगता काम..

त्याची काम करण्याची पद्धत ही निराळी आणि राज्याला पुढे नेणारी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या विरोधी पक्षाचे सरकार असले तरी राज्याच्या हिताचे अनेक निर्णय मग ते त्यांच्या खात्याशी संबंधित असतील किंवा अन्य त्यांनी नेहमीच घेतले आहेत.

महाराष्ट्राचे म्हणून तर त्यांचे राज्यातील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग व इतर विकासकामांवर लक्ष तर असतेच, पण त्यासाठी पक्ष भेद न बाळगता ते झोकून देऊन काम करतात, याचे मला विशेष कौतुक वाटते. आम्ही देखील याबद्दल त्याचे जाहीर कौतुक नेहमीच करत आलो आहोत.

परंतु नितीन गडकरी यांच्या सारखी चांगली व्यक्ती, एका चुकीच्या पक्षात असल्याची खंत वाटते. भाजपमध्ये त्यांना काम करू दिले जात नाही, त्यांचे अधिकार कमी केला जात आहेत, त्यांचे पंख छाटण्याचे काम देखील पद्धतशीरपणे सुरू असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com