पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील ७ वर्षे दलितांच्या हिताची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप व `एनडीए`च्या केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाली. या ७ वर्षांमध्ये दलित, आदिवासी, बहुजन आणि मागासवर्गीय समाजाच्या हिताची काळजी घेऊन त्यांना अधिक बळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
Ramdas Athawale
Ramdas Athawale

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप व `एनडीए`च्या   केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली. (Narendra Modi Government complete 7 Years) या ७ वर्षांमध्ये दलित, आदिवासी, बहुजन आणि मागासवर्गीय समाजाच्या हिताची काळजी घेऊन त्यांना अधिक बळ (Under Modi`s leadership this 7 years is Helpfull to SC Class) देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. 

श्री. आठवले यांनी मोदी सरकारची ७ वर्षे दलित मागासवर्गीयांच्या हित साधणारी असल्याचे सांगत सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले, जनतेने मोदी सरकारला ७ वर्षे साथ दिली. अशीच साथ या पुढेही देत राहावी. पंतप्रधान मोदी सर्वांना साथ देत सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास करतील. भारताला महासत्ता म्हणून यशस्वी करतील.

श्री. आठवले यांनी पंतप्रधान मोदी यांनी दलितांना संरक्षण देण्यासाठी अॅट्रोसिटी अॅक्ट अधिक मजबूत करण्यासाठी संसदेत कायदा केला. दलित, आदिवासी, ओबीसी यांव्यतिरिक्त सवर्ण समाजातील गरिबांना आर्थिक निकषावर १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. जम्मू- काश्मीर प्रकरणी ३७० कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन भारताशी जम्मू काश्मीरचे नाते घट्ट करीत एकसंघ केले. ट्रान्सजेडर, दिव्यांग सर्व दुर्बल घटकांना न्याय दिला. 

देशातील कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रथम लॉकडाऊन करून लाखो लोकांचे प्राण वाचविले. यंदा मात्र कोरोनाच्या केसेस अचानक खूप वाढल्या. ४ लाख केसेस झाल्या. त्यातही केंद्र सरकारने जनतेची चांगली सेवा केली. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता दुसऱ्या लाटेतून  देश सावरत आहे. मोदींनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांना सर्वांनी साथ दिल्यास आणखी प्रगतीच्या दिशेने ते देशाला घेऊन जाऊ शकतात. 

नरेंद्र मोदी हे द्रष्टे नेते आहेत या शब्दात त्यांचा गौरव  श्री. आठवले यांनी केला. त्यांच्या नेतृत्वात मागील ५ वर्षे केंद्रीय सामाजिक न्याय  आणि अधिकारीता राज्यमंत्री पदाची जबाबदारी मी संभाळत आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com