राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मिशन 'सुपर शंभर' ; ३४ विधानसभा निरीक्षकांवर जबाबदारी..  - Nationalist Youth Congress's mission 'Super Hundred'; Responsibility on 34 assembly inspectors. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मिशन 'सुपर शंभर' ; ३४ विधानसभा निरीक्षकांवर जबाबदारी.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 जून 2021

राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील २२ व्या वर्धापनदिना निमित्त आता नव्याने पक्ष संघटन वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता दीडवर्ष उलटून गेले आहे. कोरोनाचे संकटही बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे सरकार व सत्तेतील तीनही पक्ष संघटनात्मक पातळीवर देखील कामाला लागले आहेत. (Nationalist Youth Congress's mission 'Super Hundred'; Responsibility on 34 assembly inspectors.) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिना नंतर पक्षाने आता अंगीकृत सर्वच संघटनांना कामाला लावले आहे. या अंतर्गतच राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने राज्यातील शंभर विधानसभा मतदारसंघात `सुपर १००`, हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील  शिवसेना-राष्ट्रवादी- काॅंग्रेस या तीनही पक्षांनी आपापल्या पक्षाची ताकद राज्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. (Ncp president Sharad Pawar) राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वच पक्षांना आहे, अशी भूमिका प्रमुख नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आघाडी आणि स्वबळाची भाषा या नेत्यांकडून सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील २२ व्या वर्धापनदिना निमित्त आता नव्याने पक्ष संघटन वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. (Ncp State President Jayant Patil) राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा सुपर-१०० हा  देखील त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटन हे प्रत्येक मतदारसंघात मजबूत करण्याच्या हेतूने  हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ( Nationalist Youth Congress President Mehboob Shaikh) यासाठी ३४ विधानसभा निरीक्षक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. 

राज्यातील युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षक पदी आज नवनिर्वाचित ३४ पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना जबाबदारीने मतदारसंघातील प्रत्येक युवकांपर्यंत हे निरीक्षक आणि युवा कार्यकर्ते पोहचवतील, असा विश्वास देखील महेबूब शेख यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा ः आरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे, केंद्रावर दबाव आणा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख