आरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे..केंद्रावर दबाब आणा.. - Maratha OBC reservation Demand Central Government Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे..केंद्रावर दबाब आणा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 जून 2021

राज्य सरकारला याबाबत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत

जळगाव : " मराठा व ओबीसी आरक्षणाचा  Maratha OBC reservation विषय १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे आता केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे सर्वांनी एक होऊन आता केंद्रावर दबाव आणावा," असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी केले आहे. जळगाव येथे खडसे माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. मराठा समाजात एक वर्ग गरीब आणि मध्यम वर्गीय असून ती हलाखीचे जीवन जगतो आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे करून उपयोग नाही, आता १०२ वी घटना दुरुस्ती झाल्याने याचे सर्व अधिकार आता केंद्र सरकारकडे गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला याबाबत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत, आता याचे संपूर्ण अधिकार केंद्र  सरकारला आहेत." 

"मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल किंवा नव्याने कोणते आरक्षण द्यायचे असेल तर यासंबधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार केंद्राकडे आहे.त्या मुळे आता मराठा व ओबीसी आरक्षणासाठी आता केंद्र सरकारवर दबाव आणावा लागेल. यासाठी सर्वांनी एकजूट करण्याची गरज आहे," असे खडसे म्हणाले.

"सरकार तुमचं ऐकतंय..मग आंदोलने कशाला ? 

मुंबई : "सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे, त्यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील हा विश्वास बाळगा. समाजातील निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी आज मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू,"  असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधीना आश्वस्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख