कोरोना काळात गर्दी जमवून उद्धाटन करणे मंत्री भुमरे यांनाही भोवणार

राजकीय पुढाऱ्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही का? असा संतप्त सवाल देखील खंडपीठाने राज्य सरकारला केला होता.
Minister Sandipan Bhumre News Aurangabad
Minister Sandipan Bhumre News Aurangabad

औरंगाबाद ः शिवसेना आमदाराने केलेल्या एका पाणीपुरवठा योजनेवरून खंडपीठाने या आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला का? कोणती कलम लावली अशी विचारणा खंडपीठाने केली होती. (Why didn't the bench file a case against Minister Sandipan Bhumare) त्यानंतर आता शिवसेनेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील एका आरोग्य केंद्राच्या उद्धाटनावरून देखील खंडपीठाने त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? पोलिस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना राजकीय पुढाऱ्यांकडूनच नियम पायदळी तुडवले जात असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त करत आता आम्हालाच आदेश द्यावे लागतील, असे म्हटले होते. (Wouldn't a political leader spread the Corona? The bench had also asked the state government) राजकीय पुढाऱ्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही का? असा संतप्त सवाल देखील खंडपीठाने राज्य सरकारला केला होता.

पैठण तालुक्यातील एका आरोग्य केंद्राचे उद्धाटन करतांना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी गर्दी जमवल्याचे छायाचित्र व बातम्या ८ मे रोजीच्या वृतपत्रांमधून प्रसिध्द झाल्या होत्या. या प्रकरणात  गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसवेकावर गुन्हे दाखल करण्यात आले. (In this case, charges were filed against the village sarpanch, deputy sarpanch and gram sevak.) पैठणच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी मंत्री महोदयांनी गर्दी करू नका,असे आवाहन केले होते असे कोर्टासमोर सांगितले.

यावर प्रशासन मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. या याचिकेवर आज (ता.१३) खंडपीठात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अॅड. सत्यजीत बोरा यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी बाजू मांडली.

या शिवाय हेल्मेट सक्ती आणि शहरातील शहागंज, सिटी चौक भागात कोरोना नियम मोडले जात असल्याचे सांगत खंडपीठाने थेट एसआरपी तैनात करून लोकांना कोरोनाचे नियम पाळण्यास भाग पाडा असे आदेश दिले आहेत.(The bench has directed the people to comply with the rules of corona by deploying SRP directly.) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खंडपीठाने फौजदारी स्वरुपाची सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com