अजित पवारांचे इमेज मेकिंग पडणार सहा कोटीला  - Ajit Pawar will have to spend Rs 6 crore to handle social media | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

अजित पवारांचे इमेज मेकिंग पडणार सहा कोटीला 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

मुंबई : मागील वर्षीपासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक चणचण जाणवत आहे. या संकटामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांच्या सोशल मीडियावर (Social Media) तब्बल ६ कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे.  (Ajit Pawar will have to spend Rs 6 crore to handle social media)

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या आदेशात पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी व त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका बाहेरच्या कंपनीची नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब व इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल. याशिवाय, व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही कंपनीवर असणार आहे. पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाणार आहे.

हे ही वाचा : नीलम गोर्हेंनी फोन करताच बिलासाठी अडवून ठेवलेला मृतदेह मिळाला नातेवाइकांना
 

आदेशात आणखी काय म्हटलंय?

सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात म्हटले आहे की ''माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात (DGIPR) सोशल मीडियाचे काम बघण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक गोष्टींची माहिती असणाऱ्या लोकांची कमतरता आहे. त्यामुळे पवार यांच्या सोशल मीडियाचे काम बाहेरच्या यंत्रणेकडे देणे योग्य ठरेल''. अजित पवार यांच्या खात्याने घेतलेले निर्णय आणि महत्त्वाच्या घोषणांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे ही या यंत्रणेची जबाबदारी असणार आहे. 

लोकांच्या समस्या अजित पवार यांच्या पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचू शकतील, याची व्यवस्था करण्याचे कामही संबंधित एजन्सीकडे असेल. नव्या एजन्सीची निवड DGIPR च्या पॅनेलवर असलेल्या एजन्सीजमधूनच होणार आहे. हे सर्व काम सुरळीत सुरु राहील, याची अंतिम जबाबदारी DGIPR असेल.

हे ही वाचा : भातखळकर म्हणातात; महागडी लस लोकांनी खरेदी करावी हा तर राज्य सरकारचा कुटिल डाव
 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडिया खाती हाताळण्याची जबाबदारी जुलै २०२० मध्येच बाहेरच्या एजन्सीकडे देण्यात आली आहेत. या एजन्सीची नियुक्ती करताना ई-टेंडरिंगची प्रक्रिया अवलंबण्यात आली. या एजन्सीला आणखी पैसे देण्याची तयारीही DGIPR ने दर्शविली आहे.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवार यांची सोशल मीडिया खाती हाताळण्यासाठी बाहेरची एजन्सी नेमण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. DGIPR मध्ये 1200 कर्मचारी आहेत. या विभागाला वर्षाला 150 कोटींचा निधी दिला जातो. मग इतके करुनही अजित पवार यांच्यासाठी बाहेरच्या यंत्रणेची गरज का लागते, असा सवालही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख