औरंगाबादेतील प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा.. - Make the zoo in Aurangabad of international standard. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

औरंगाबादेतील प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त ५० एकर जागा लागणार आहे. यासठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद ः मिटमिटा भागात विकसित करण्यात येणाऱ्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा, त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. (Make the zoo in Aurangabad of international standard, Said, CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मंगळवारी प्राणिसंग्रहालयाच्या जागेबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद शहराला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. (Aurangabad Zoo) हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करतांना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळे ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत. हे विचारात घेऊन प्राणिसंग्रहालयाचे काम झाले पाहिजे, औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे.

जागेबाबत निर्णय नाही

सिद्धार्थ उद्यानात १४ एकर जागेवर प्राणीसंग्रहालय आहे. मात्र ही जागा कमी असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दाखवलेल्या दूर करण्यासाठी व मानकांनूसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे ४० हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू आहे.

या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त ५० एकर जागा लागणार आहे. यासठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत यावर चर्चा देखील झाली, मात्र निर्णय झाला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मंगळवारी झालेल्या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते.

हे ही वाचा ः पंकजा मुंडेबाबत प्रश्न विचारताच दरेकरांनी हात जोडले

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख