पंकजा मुंडेबाबत प्रश्न विचारताच प्रवीण दरेकरांनी हात जोडले.. - When asked about Pankaja Munde, Praveen Darekar joined hands. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

पंकजा मुंडेबाबत प्रश्न विचारताच प्रवीण दरेकरांनी हात जोडले..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

चंद्रकांत पाटील यांच्यावर ईडी चौकशीचे आरोप करणे चुकीचे असून  ते सर्व चौकश्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

मुंबई ः  पंकजा मुंडे या आपल्या नाराज कार्यकर्त्यांना समजवण्यास सक्षम आहेत, त्या ही नाराजी नक्कीच दूर करतील, असा विश्वास  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतेच केले होते.  आज पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या संदर्भात पत्रकारांनी पुन्हा दरेकर यांना विचारले असता यावर कुठेही भाष्य न करता त्यांनी हात जोडले. (When asked about Pankaja Munde, Praveen Darekar joined hands.) दरेकरांना पंकजा यांच्या आजच्या भूमिकेवर प्रतिक्रिया का दिली नाही? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना पर्यायाने पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याची भावना मुंडे भगिनींच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली. यातून मराठवाडा व राज्यातील काही भागातून भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. (Bjp Leader Pankaja Munde) यावर दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज समर्थंकाची भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या. (Bjp opposition Leader Pravin Darekar) यावर आपली भूमिका स्पष्ट करत त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आपण नामंजूर करत असल्याचे जाहीर केले.

शिवाय पंकजा मुंडे आज काहीतरी महत्वाचा निर्णय घेणार, त्या शिवसेनेत प्रवेश करणार या सर्व चर्चांना देखील पुर्ण विराम दिला. पंकजा मुंडे यांच्या या भूमिके संदर्भात प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु कालपर्यंत भरभरून बोलणाऱ्या दरेकरांनी आज मात्र हात जोडत यावर भाष्य करण्यास नकार दिला. माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा आहेत. मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी पदाधिकारी आहे, हे पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगत आपण राज्यातील नेतृत्व मानत नाही हे यातून स्पष्ट केले. कदाचित यामुळेच दरेकरांनी पंकजा यांच्या संदर्भात बोलणे टाळल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात मुंडे भगिनींना डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे नुकत्याच दिल्ली दौरा करून आल्या. त्या दिल्लीत असतांना इकडे महाराष्ट्रात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. यावर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्यांना बदनाम करू नका, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी देखील पंकजा या नाराज असल्यामुळे दिल्लीला गेल्या नाहीत, तर राष्ट्रीय सचिवांच्या पक्षाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीसाठी गेल्याचे स्पष्ट करत नाराज समर्थकांची समजूत काढण्यास त्या सक्षम असल्याचे म्हटले होते.

परंतु पंकजा यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कलेले आक्रमक भाषण आणि आपण राज्यातील नाही तर केंद्रातील नेतृत्वाला मानतो, असा सूचक इशारा दिल्यानंतर, दरेकर यांनी देखील सावध पावित्रा घेतल्याचे दिसून आले. प्रसार माध्यमाशी इतर विषयांवर भरभरून बोलणारे दरेकर पंकजा मुंडे यांचा विषय काढताच मात्र हात जोडून गप्प राहिले.  पकंजा यांच्याबद्दल मौन धारण केलेल्या दरेकरांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाविकास आघाडी सरकार यांच्यावर मात्र जोरदार टीका केली.

ते फकीर, त्यांच्याकडे काय मिळणार..

दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीत कुठलंही एकवाक्यता नाही, नानांनी यापूर्वी अनेकदा अशा प्रकारे तलवार मँन केली आहे. रोज रडे त्याला कोण मरे अशी, त्यांची अवस्था झाली आहे.  भावना तर त्यांनी प्रकट केल्या, पण  एकमेकांबद्दलच त्यांना विश्वास नाही. मेट्रो कारशेडच्या मागे हजारो कोटी वाढत आहेत, पर्यायाने याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे.  सरकर आमचे नाही त्यामुळे खडसेंचा अहवाल आम्ही गायब केला असे म्हणणे किंवा आमच्यावर आरोप करण्यात अर्थ नाही. 

चंद्रकांत पाटील यांच्यावर ईडी चौकशीचे आरोप करणे चुकीचे असून  ते सर्व चौकश्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.  कुठलीही यंञणा चौकशी करून काही उपयोग नाही, फकीर व्यक्तीकडे काय मिळणार. ईडीकडून कारखान्यांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत कायदा हा सर्वांना सारखा असतो. त्यामुळे जी काय कारवाई होईल त्याला सर्वांना सामोरे जावे लागेल. यात कुठलाही पक्षपात करून चालणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

हे ही वाचा ः विधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडेच आहे आणि राहिल, यावरून कसलाच वाद नाही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख