भाजप पदाधिकाऱ्याच्या मारहाण प्रकरणावरून जालन्यात दानवे विरुद्ध लोणीकर गट..

फडणवीस आज दुपारी चार वाजता जालन्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Mp Raosaheb Danve-Mla Babanrao Lonikar News Jalna
Mp Raosaheb Danve-Mla Babanrao Lonikar News Jalna

जालना ः भाजयुमोचा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले याला डीवायएसपी यांच्यासह सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीवरून जालन्यात(Lonikar group against Danve in Jalna over BJP office bearer's beating case ) खासदार रावासहेब दानवे विरुद्ध माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर अस दोन गट पडल्याचे दिसून आले आहे.

नारीयलवाले याला मारहाण करतांनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने हे प्रकरण लावून धरले. लोणीकर यांनी पोलिस अधिक्षकांसह गृहमंत्री, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना पत्र पाठवून मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

फडणवीस यांनी देखील या प्रकरणांची व लोणीकरांच्या पत्राची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली होती.(Five people, including a police sub-inspector, were suspended.) त्यांनतर तात्काळ पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले.

परंतु या संपुर्ण प्रकरणापासून जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मात्र चार हात लांबच होते. त्यांनी या प्रकरणाबद्दल अवाक्षरही काढले नाही, कि घटनेचा निषेध करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. (District MP and Union Minister of State Raosaheb Danve, however, was four hands away from the whole affair.) यावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा दानवे विरुद्ध लोणीकर असे दोन गट असल्याचे समोर आले आहे.

एकाच जिल्ह्यातील एकाच पक्षातील दानवे आणि लोणीकर हे नेत असले तरी या दोघांमध्ये फारसे सख्य असल्याचे कधी दिसून आले नाही. उलट एकमेकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्नच या दोघांकडून झाल्याचे अनेकदा समोर आले होते. भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण व डीवायएसपीने गवळी समाजाबद्दल अपशब्द काढल्याच्या प्रकरणावर दानवे यांची चुप्पी जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन घडण्यासाठी बोलकी आहे.

दोन नेते, दोन कार्यकारणी..

रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे हे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी देखील या प्रकरणावर गप्प राहणे पसंत केले आहे. यामागे देखील भाजयुमोच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडीचा वाद असल्याचे बोलले जाते. जिल्हा कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी त्यावर आक्षेप घेत स्वतःची स्वतंत्र कार्यकारणी जाहीर केली होती. त्यामुळे दोन नेते दोन कार्यकारणी अशी जिल्ह्यातील परिस्थिती आहे. यामुळेच दानवे यांनी नारीयलवाले प्रकरणावर न बोलण्याची भूमिका घेतल्याचे समजते.

ऐरवी गल्ली ते दिल्ली अशा कुठल्याही विषयावर तातडीने आपली प्रतिक्रिया देणारे रावासाहेब दानवे एका पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर, जेव्हा की ते राज्य पातळीवर गाजते आहे, त्यावर व्यक्तच होत नाही, याचे अनेक तर्क लढवले जात आहेत. (Are the demons silent on this matter as demanded by Lonikar? There is also such a discussion.) या उलट लोणीकर यांनी मात्र तातडीने या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करत कारवाईची मागणी केली. लोणीकरांनी मागणी केली म्हणून दानवे या प्रकरणावर गप्प आहेत का? अशी देखील चर्चा आहे.

तर दुसरीकडे दानवे गट शिवराज नारीयलवाले याला भाजपचा पदाधिकारी म्हणून नका, अशी भूमिका घेत असल्याची चर्चा देखील आहे. एकंदरित भाजप पदाधिकाऱ्याच्या मारहाण प्रकरणावर दानवे आणि लोणीकर यांच्या वेगळ्या भूमिका असल्याचे दिसून आले आहे.

फडणवीस आज जालन्यात

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जरी भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ते अत्यंत गांभीर्याने घेतले. मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहलेल्या पत्रानंतर अवघ्या काही तासांतच मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर फडणवीस आज दुपारी चार वाजता जालन्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर देखील ते जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Editd By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com