खाकीचा अवमान खपवून घेणार नाही, सोशल मिडियावर रुबाब दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तंबी..

डीजी आॅफीसकडून सोशल मिडियावर अशा प्रकारी खाकीचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आले आहेत.
Supriendent of police Warn News jalna
Supriendent of police Warn News jalna

औरंगाबाद ः प्रसिद्धी, लाईक आणि फॅन फाॅलोअर्स वाढवण्याच्या नादात पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्या गणेवशासह चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होऊन लोक त्यावर तिखट प्रतिक्रिया देत आहेत. (Khaki's insults will not be tolerated.) या प्रकाराची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून यापुढे असे प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.

सोशल मिडियाने सर्वसामान्यांप्रमाचे पोलिसांना देखील भुरळ घातली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी खरंतर नागरिकांचे खरे हिरो. ( Supritendent of Police Vinayk Deshmuk, Jalna) पण त्यांनाही सोशल मिडिया खुनावत असतांना अनेकदा याचा वापर करतांना आपण खाकी वर्दीचा अवमान तर करत नाही ना? याचा विचार देखील त्यांच्या मनात येत नाही.

या पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी नुकतील एक बैठक घेऊन या संदर्भात कडक सूचना दिल्या आहेत. ड्युटीच्या वेळात गणवेशातले व्हिडिओ, किंवा वाहनासोबतचे फोटो पोस्ट करण्याचे प्रमाण पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वाढले आहेत.

काही दिवसांपुर्वी अमरावती पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पिस्तुलसह आपला एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. तर ठाणे येथील एका महिलेने आपल्या पोलिस मित्राची खाकी वर्दी घेऊन तीन व्हिडिओ तयार करून ते आपल्या सोशल मिडियाच्या अकाऊंटवरून पोस्ट केले होते.

यावर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे कोणतेही कृत्य कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घडू नये याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे देखील देशमुख यांनी बैठकीत स्प्षट केले.  डीजी आॅफीसकडून सोशल मिडियावर अशा प्रकारी खाकीचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आले आहेत.

पोलिसांनी सोशल मिडियावर सक्रीय राहण्यापेक्षा जनमाणसांच्या सुरक्षा व संरक्षणावर लक्ष देऊन काम केले तरी हिरो होता येते, असे म्हणत विनायक देशमुख यांनी सोशल मिडिया अॅक्टीव्ह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्जड दम भरला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com