म्हाडाची आठ हजार घरांसाठी १४ ऑक्टोबरला लॉटरी 

म्हाडाच्या घरांच्या दर्जावर लक्ष ठेवले जाणार आहे.
 Jitendra Awhad .jpg
Jitendra Awhad .jpg

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या ८ हजार २८८ घरांसाठी लॅाटरी काढण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी २३ ऑगस्टपासून अर्ज विक्री सुरु होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. (MHADA's lottery for 8,000 houses on October 14) 

ही घरे ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, विरार, बोळींज, मीरा रोड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत. अर्ज भरण्यासाठी ५६० रुपये लागणार आहेत. अर्जासोबत EWS 5  हजार, MIG 10 आणि HIG करता १५ हजार. उच्चस्तरीय देखरेख समितीमार्फत लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी १४ ऑक्टोबरला काढली जाईल. यासाठी २३ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होईल. 

घराची मागणी लक्षात घेता नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर इथेही ७ ते १० हजार घरे पुढील दोन वर्षात बांधली जाणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या दर्जावर लक्ष ठेवले जाणार आहे. घरांच्या दर्जा संदर्भात बिल्डरला जबाबदार धरले जाणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. गोरेगावमध्ये २४० एकरचा भूखंड आहे, तिथे प्रकल्प उभारून ३०० चौरस फूटाचे घर देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगतिले. यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा मुंबईतील सर्वसामान्यांना व्हावा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

नायगाव येथील पोलिस वसाहतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ''नायगाव पोलिस वसाहतीचा आणि म्हाडाचा काहीही संबंध नाही. ती घरे पोलिस आयुक्तांच्या अखत्यारित येतात. pwd ने ही घरे राहण्यायोग्य नाहीत असा अहवाल दिला आहे. त्यांना बेघर होऊ देणार नाही, त्याच्यासाठी पर्यायी घरे देणार, असल्याचे त्यांनी सांगितले. आता विरोधी पक्षनेते घरे तोडू देणार नाही म्हणतात. मात्र, घरे पडली आणि दुर्दैवाने कुणाचे बळी गेले, तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी केला. पोलीसांना तिथे घरे दिली जाणार आहेत, तो भूखंड पोलीसांच्या घरासाठी आरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com