जयंत पाटील म्हणतात,निवडणुकीत सहकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास मी कटीबद्ध..

धनंजय मुंडे यांनी भूसंपदनाबाबत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी यावेळी घेतली.
Minsiter Jaynt Paitl -Dhnanjay Munde news Mumbai
Minsiter Jaynt Paitl -Dhnanjay Munde news Mumbai

मुंबई  : बीड जिल्ह्यातील मर्यादित सिंचनाच्या सोयी पाहता जिल्ह्यातील जलसंपदा सक्षम करण्यासाठी विविध साठवण तलाव निर्माण करणे, मध्यम व लघु प्रकल्पांची उंची वाढवणे, विविध उपसा सिंचन योजना राबविणे  याला जलसंपदा विभागाकडून गती देण्यात आली आहे. (Jayant Patil says, I am determined to fulfill the promises given by the people's representatives.)  यांसह जिल्ह्यातील आमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत जलसंपदा विभागाशी संबंधित दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून  आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीड जिल्ह्यातील (Guardian Minsiter Dhnanjay Munde) जलसंपदा विभागातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

परळी तालुक्यातील वाण प्रकल्पातील गाळ काढून उंची वाढविण्यासंदर्भातील सर्वेक्षण मेरी (नाशिक) यांनी पूर्ण केले आहे. त्याचा  अहवाल तातडीने प्राप्त करून त्यात सुचवल्याप्रमाणे गाळमुक्त धरण करून उंची वाढविण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश  जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ( Minister Jayant Paitl)   वाण व कुंडलिका धरणाच्या पाण्याचे वितरण बंदिस्त नाला वितरण प्रणाली द्वारे राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावासही बैठकीत मान्यता देण्यात आली. 

माजलगाव उजव्या कालव्याच्या अस्तरीकरण कामाच्या सर्वेक्षणाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून अस्तरीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना देखील पाटील यांनी यावेळी दिल्या.  हे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील शाश्वत सिंचनाचा मोठा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

भुसंपादनाचा प्रश्न जिल्हास्तरावर सोडवणार..

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावात उपसा सिंचन योजनेद्वारे भोसे खिंड बोगदा किंवा अन्य पर्याय वापरून अलाईनमेंट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली. 

माजलगाव तालुक्यातील लोणी-सावंगी उपसा सिंचन योजनेच्या सद्यस्थितीचा यावेळी आढावा घेण्यात आला, भूसंपदानात येणाऱ्या अडचणी  तातडीने दूर कराव्यात असे आदेशही त्यांनी दिले.  धनंजय मुंडे यांनी भूसंपदनाबाबत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी यावेळी घेतली.

तसेच या कामाला पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी राज्याच्या पुरवणी मागण्यांमधून उपलब्ध करून येत्या दोन वर्षांच्या आत ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात येतील असे पाटील म्हणाले. वडवणी तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करावे.  हे पाणी उपलब्ध झाल्याने वडवणी तालुक्यातील ५८०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

बीड शहराचा पाणी प्रश्न सुटणार..

बीड शहराचा पाणीपुरवठ्याच्या प्रश्न कायमचा मिटावा यासाठी बिंदुसरा नदीवर बीड शहर हद्दीत निम्नस्तर बंधारा बांधणे प्रस्तावित आहे, हे काम सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अडचणी व त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा, नगरविकास तसेच अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान बीड जिल्ह्यातील अन्य धरणात गाळमुक्त धरण योजना राबवून त्यांची उंची वाढवणे यासह विविध लघु प्रकल्पांच्या निर्मितीसाठीच्या प्रस्तावांवर देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील व जलसंपदा विभागाचे आभार मानले आहेत.

या बैठकीस जयंत पाटील, धनंजय मुंडे, आमदार  प्रकाशदादा सोळंके,  संदीप क्षीरसागर,  बाळासाहेब आजबे (तिघे व्हीसीद्वारे) तसेच  संजय दौंड, पृथ्वीराज साठे यांच्यासह जलसंपदा विभागाचे प्रकल्प सचिव टी. एन. मुंडे, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के.बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा सहसचिव अतुल कपोले, औरंगाबाद लाभ क्षेत्र विकास विभागाचे मुख्य अभियंता दि.द. तवार आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com