पंतप्रधान निधीतून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची चौकशी करा; रुग्णांच्या जीवाशी खेळ नको..

पीएम केअर फंडातून मराठवाड्यात पाठवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे.
Ncp Mla Satish Chavan News Aurangabad
Ncp Mla Satish Chavan News Aurangabad

औरंगाबाद ः पंतप्रधान सहाय्यता निधीतून औरंगाबादसह मराठवाड्यात पाठवण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सर्वप्रथम एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. यावरून भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड, अतुल सावे याचे त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालायातील बैठकीत खटके देखील उडाले. (Investigate ventilators funded by the Prime Minister, said Mla Satish Chavan)आता पंतप्रधान सहाय्यता निधीतून देण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरची चौकशी करून ते पुरवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात पीएम केअर विरुद्ध सीएम केअर फंडावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजपमध्ये संघर्ष उडाला होता. (The ruling Maha Vikas Aghadi government and the opposition BJP had clashed over PM Care against the CM Care Fund.) त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राकडून पीएम केअर फंडातून मराठवाड्यात पाठवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी होणाऱ्या लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत पीएम केअर फंडातून पाठवण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून ते धूळखात पडून असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. (MP Imtiaz Jalil had alleged that the ventilator was of inferior quality and was lying in the dust.) त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. घाटीला पाठवण्यात आलेले अनेक व्हेटिंलटर उघडलेच नाही तर ते नादुरुस्त कसे?असा सवाल भाजपने केला आहे. यात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे.

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज घाटीला भेट देऊन तेथील नादुरुस्त व्हेंटिलेटरची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केंद्र सरकार व जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर टीका केली. (Satish Chavan said that 150 ventilators were provided to Ghati Hospital from PM Care Fund.)  सतीश चव्हाण म्हणाले, पीएम केअर फंडातून घाटी रूग्णालयाला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले.

मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून आयसीयू कक्षात लावण्याच्या दर्जाचे नसल्याचे घाटीतील तज्ञ डाॅक्टरांचे मत आहे.  तसा अहवाल देखील यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ नको..

खरं तर ज्या वेळी घाटीला १५०  व्हेंटिलेटर देण्यात आले तेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याला कशी मदत केली याचे गोडवे गायले.  मात्र हे व्हेंटिलेटर आता बिनकामाचे निघाल्यावर हे नेते तोंडघशी पडले आहेत. व्हेंटिलेटर कसे चांगले आहे हे सांगण्याचा भाजप नेते आता केविलवाणा प्रयत्न करू लागले आहेत.

दीडशे व्हेंटिलेटर देण्याऐवजी पंधराच व्हेंटिलेटर चांगल्या दर्जाचे दिले असते तर अनेक गंभीर असलेल्या रूग्णांसाठी उपयोगात आणता आले असते. (Don't play with the patient's soul.) केंद्र सरकारला माझी विनंती आहे की, मदत करता येत नसेल तर करू नका. मात्र असे निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे देऊन कृपया रूग्णांच्या जीवाशी खेळू नका.

तसेच राज्य सरकारला देखील मी विनंती करणार आहे की, सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवणार्‍या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी देखील चव्हाण यांनी यावेळी केली. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com