धक्कादायक : राजकीय, धार्मिक कार्यक्रमांमुळेच भारतात कोरोना वाढला... WHOचे स्पष्टीकरण

धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही, असेही डब्लूएचओनंत्यात म्हटलं आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-13T160136.621.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-13T160136.621.jpg

नवी दिल्ली  : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या कारणावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. या आरोप-प्रत्यारोपात जागतिक आरोग्य संघटनेने WHO (डब्लूएचओ) प्रसिद्ध केलेल्या अहवालात  भारतात वेगानं वाढत असलेल्या कोरोनाची कारणे स्पष्ट केली आहेत. Corona infection increased in India due to political and religious events WHO explanation

देशात पाच राज्यात काही दिवसापूर्वी निवडणूका झाल्या. भारतात निवडणूक प्रचार आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात फैलावण्यास मदत झाली. ‘बी.१.१.७’ या प्रकाराचा कोरोना विषाणू ब्रिटनमध्ये प्रथम आढळला आणि आता अमेरिकेत त्याचा प्रसार झाला आहे. बी. १.६१७ हा जास्त धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण अनुवांशिक क्रमवारीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय कोरोना साथीच्या फैलावाला या अवताराला दोष देता येणार नाही, ‘डब्लूएचओ’च्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

राजकीय कार्यक्रमांमुळे झालेली गर्दी हे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)ने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. डब्लूएचओनं कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या साप्ताहीक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही, असेही डब्लूएचओनं त्यात म्हटलं आहे. या कारणांमुळे संसर्गाचे प्रमाण किती वाढले याबद्दल नेमकेपणाने सांगता येत नाही, असेही त्यात स्पष्ट केले आहे. ‘डब्लूएचओ’च्या संशोधकांची मतानुसार, भारतात विषाणूंच्या इतर प्रकारांपेक्षा ‘बी. १.६१७’च्या वाढीचा दर जास्त आहे, या प्रकाराचा संसर्ग झाल्याचे २७ टक्के चाचण्यांमधून निदान झाले आहे. 
 
कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा नवा अवतार प्रथम ऑक्टोबर २०२०मध्ये दिसून आला. याचे अनेक म्युटेशन आहेत. विषाणूच्या इतर प्रकारात हे म्युटेशन अधिक चिंताजनक असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना विषाणूच्याअन्य प्रकाराच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणारी प्रतिपिंडांना अन्य म्युटंटचा सामना करणे कठीण होऊ शकते. लसीकरणानंतर प्रतिपिंड तयार झालेल्या लोकांचा अभ्यास केल्यानंतर ही प्रतिपिंड ‘बी.१.६१७’ वर फारशी परिणामकारक ठरत नसल्याचे दिसले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे जगाच्या चिंतेचे कारण ठरलेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील (व्हेरिएंट) कोरोना विषाणू भारतीय नाही.’’ असा दावा केंद्र सरकारने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३२ पानी अहवालात या नव्या अवताराबाबत कोठेही भारतीय शब्द वापरलेला नसल्याने माध्यमांमध्ये त्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळपणाच्या असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील कोरोना विषाणू कारणीभूत असल्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानंतर प्रमुख आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रसारमाध्यमांमध्येही या अवताराला भारतीय असा टॅग लावण्यात आला होता. अमेरिका आणि ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा अवतार कोरोना प्रतिबंधक लशींना दाद न देणारा आणि प्रतिपिंडे बनण्यास रोखणारा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने  याबाबत खुलासा केला.

भारतामध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराने जगभरातील ४४ देशांमध्ये हातपाय पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटेनेने म्हटले आहे. या उपप्रकाराचा प्रसार सर्वांसाठीच चिंताजनक असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले. जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर जागतिक आरोग्य संघटना बारकाईने लक्ष ठेवून असून या विषाणूच्या बदलत चाललेल्या स्वरूपाची देखील वेळोवेळी नोंद घेतली जात आहे.
 Edited by : Mangesh Mahale 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com