लालपरीचं तिकीट महागणार; परिवहन मंत्र्यांकडून संकेत.. - Indications from Transport Minister of ST passenger fare hike | Politics Marathi News - Sarkarnama

लालपरीचं तिकीट महागणार; परिवहन मंत्र्यांकडून संकेत..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेतन करारानुसार होते, त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग देता येणार नाही.

औरंगाबाद : कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मालवाहतूक, एसटीसाठी वापरणारे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करून उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांचा विचार करत असल्याचे परिवहन मंत्री ॲङ अनिल परब यांनी सांगितले. (Indications from Transport Minister of ST passenger fare hike; It will also increase the source of income.) डिझेल दरवाढीमुळे एसटीवर अतिरिक्त भार पडल्यामुळे भविष्यात एसटी प्रवासी भाडेवाढ होऊ शकते, असेही परब म्हणाले.

एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व नागरिक इच्छितस्थळी पोहचण्यासाठी एसटीचा वापर करतात. ( Transport Minister Anil Parab Maharashtra) आता एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली आहे. यामध्ये अजून काही सुधारणा करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या साठा बांधणी, इंजिन आदी विभागांना परब यांनी भेट दिली. 

कार्यशाळेच्या पाहणीनंतर शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये औरंगाबादहून शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये स्वत: मंत्री परब यांनी प्रवेश करत श्रीरामपूरच्या प्रवाशाशी संवाद साधला.

प्रवाशांशी साधला संवाद..

कार्यशाळेच्या पाहणीनंतर शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये औरंगाबादहून शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये स्वत: मंत्री परब यांनी प्रवेश करत श्रीरामपूरच्या प्रवाशाशी संवाद साधला.

एसटीच्या कुठल्याही खाजगीकरणाचा विषय नाही. मात्र दर्जेदार सेवा देण्यासाठी बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच  नविन बस बांधणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माहाकार्गोच्या माध्यमाने मालवाहतूक सुरु केली आहे.  एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

डिझेल दरवाढीचा भार..

डिझेल दरवाढीमुळे एसटीवर दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळेच आगामी काळात तिकीट दरवाढीचा पर्याय समोर दिसत आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचे  परब यांनी स्पष्ट केले.

एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेतन करारानुसार होते, त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एसटीच्या ताफ्यातील साडेतीन हजार बसेस बाद होणार आहेत. त्यामुळे नविन बसेस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बसची बांधणीही केली जाणार आहे. 

हे ही वाचा ः वडेट्टीवारांनी काढली नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेतील हवा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख