संभाव्य महाविकास आघाडी झाली, तर बीड जिल्ह्यात जागा वाटप ठरणार डोकेदुखी..

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सांगीतले आहे. पण, जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसला कुठल्या जागा देणार हा कळीचा मुद्दा आहे.
Beed district political News Ncp-Shivsena
Beed district political News Ncp-Shivsena

बीड : आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढविणार, असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सांगीतले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी सध्या राजकीयदृष्ट्या सुसाट आहे.  (If there is a possible grand alliance, allotment of seats in Beed district will be a headache.)मात्र, या संभाव्य आघाडीमुळे राष्ट्रवादी, शिवसेनेच्या जागा वाटपांचा मोठा पेच निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात विधानसभेच्या सहा आणि लोकसभेची एक जागा आहे. आता निवडणुका कधी होणार हे सांगता येत नाही. पण, जर मुदतीत निवडणुका झाल्या तर अगोदर लोकसभा व नंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. (Minister Dhnanjay Munde) त्यावेळी लोकसभेची जागा जर राष्ट्रवादीने लढविली तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादीला चांगला वाटा द्यावा लागेल.

सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन आमदार आहेत. पुर्वीच्या भाजप - सेना युतीत बीडची जागा शिवसेनेकडे असे. (Ncp Leader Sharad Pawar) आता नव्या संभाव्य आघाडीत नेमकी हीच जागा कळीचा मुद्दा ठरू शकते. कारण, बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर आमदार आहेत. मग, भविष्यात रनिंग आमदार असताना ही जागा सेनेला कशी सोडायची असा पेच आहे.

कारण, संदीप क्षीरसागर हे पवारांच्या गुड बुक मधले आहेत. (Mla Sandip Kshirsagar) पुर्वी एकेकाळी माजलगावमधून शिवसेनेच्या पाठींब्यावर बाजीराव जगताप आमदार झाले होते. जर, ही जागा शिवसेनेला सोडायची झाली तर या ठिकाणीही राष्ट्रवादीचेच प्रकाश सोळंके आमदार आहेत. रनिंग आमदारांचे तिकीट कसे काटणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

त्याकाळच्या युतीत बीडची जागा सेनेला असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतल्या कुरघोड्यांमुळे भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेने कॅबीनेट मंत्रीपदही दिले. पण, त्यांचा पराभव तर झालाच. पण, त्यांनी आव्हान दिलेले शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार झाले. त्यामुळे सध्या क्षीरसागर शिवसेनेच्या मेन स्ट्रिममध्येही फारसे दिसत नाही.

जर, निवडणुकीत महाविकास आघाडी  झालीच तर जागा वाटपांतही शरद पवारांचाच वरचष्मा राहील यात शंका नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. कदाचित आष्टीची जागा शिवसेनेला सोडण्याचाही फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. अशा वेळी क्षीरसागरांना भाजपचा पर्याय शोधण्याची गरज पडू शकते. 

पंडीत, क्षीरसागरांसमोर पेच..

गेवराईतल्या माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासमोरही या संभाव्य महाविकास आघाडीचा पेच आहेच. तसेही महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील आमदार, मंत्री राहीलेले जयदत्त क्षीरसागर व बदामराव पंडित या शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विरोधातलेच प्रमुख नेते राष्ट्रवादीत आहेत.आता भविष्यात तर ही डोकेदुखी अधिकच वाढू शकते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com