आधी विरोधात काम केले,आता एकत्र; ओमराजे-गायकवाड दिलजमाई का?

शिवसैनिकांच्या बळावर व भाजपची साथ यामुळे तेव्हा ओमराजे यांना अनपेक्षित लीड मिळाली,त्याने अनेकाचे राजकीय अंदाज फोल ठरले.
mp omrajenibalkar and ravindra Gaikwad news osmanabad
mp omrajenibalkar and ravindra Gaikwad news osmanabad

उस्मानाबाद ः  युवासेनाप्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकसभेत निर्माण झालेला आजी-माजी खासदारांचा वाद काहीसा बाजुला पडल्याचे दिसुन आले. (Previously worked against, now together; Why Omraj-Gaikwad Diljamai?)  एका उद्घाटन सोहळ्याला माजी खासदार रविंद्र गायकवाड व विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर एकत्र आले.  यामुळे या कार्यक्रमाची जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली होती. मात्र ते मनाने एकत्र आले का ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

राजकारणात कायमच शत्रुत्व किंवा मैत्री नसते, कधी ना कधी तुम्हाला एकत्र यावेच लागते, त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. (Mp Omprakash Raje Nimabalkar) लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचे तत्कालिन खासदार रविंद्र गायकवाड यांच्यापुढे ओमराजे निंबाळकर यांनी आव्हान उभे केले होते. (Ex.Mp Ravindra Gaikwad) उमेदवारी मागितल्यानंतर विद्यमान खासदाराना डावलुन ओमराजेंना संधी दिली जाणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात होते.

मात्र पक्षाने संघटनेचा विचार करुन ओमराजे यांच्या पारड्यात वजन टाकले व त्याना लोकसभेची उमेदवारी दिली. साहजिकच या निर्णयाने रविंद्र गायकवाड दुखावले गेले आणि त्यांनी ओमराजेंना उघड विरोध करण्यास सूरुवात केली.  उमरगा विधानसभा मतदारसंघात पहिल्यापासुन शिवसेनेचे वर्चस्व असतांना तिथूनच बड्या नेत्याने उभे केलेले आव्हान ओमराजे पेलु शकणार का याविषयी शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या.

नेते नसले तरी शिवसैनिकांच्या बळावर व भाजपची साथ यामुळे तेव्हा ओमराजे यांना अनपेक्षित लीड मिळाली, त्याने अनेकाचे राजकीय अंदाज फोल ठरले. माजी खासदारांना तर मोठा धक्काच बसला. त्यांची प्रतिमा पक्षाच्या नजरेतून उतरल्याचे चित्र होते, अनेकांनी त्यांना निवडणुकीमध्ये साथ देण्यासाठी गळ घातली होती, पण तेवढ्यापुरता होकार द्यायचा मात्र आतुन करायचे तेच करायचे असे त्यांचे धोरण राहिले.

या निवडणुकीच्या अगोदरही खासदार ओमराजे व गायकवाड यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झालाच होता.  कारण जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या गटाचे दोन सदस्य तत्कालिन राष्ट्रवादीचे नेते व ओमराजे यांचे राजकीय विरोधक राणाजगजितसिंह पाटील यांच्याबरोबर गेले होते. त्याचाही राग ओमराजे यांच्या मनात होता.

मात्र आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आयोजीत उमरगा येथील एका कार्यक्रमात हे दोघेही नेते एकत्र पाहयला मिळाले. त्यामुळे त्यांच्यातील कटुता कमी झाली की, मनामध्ये एकमेकाबद्दलची तेढ तशीच आहे याचे उत्तर भविष्यातील या दोन नेत्यांच्या वाटचीवरून स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com