बॅंका पीककर्ज द्यायला टाळाटाळ करत असतील, तर मला तिथूनच फोन करा..

विकास कामासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनेतून निधी कमी पडू दिला जाणार नाही, प्रस्ताव दाखल करा मी तात्काळ निधी देतो देतो.
Shivsena Mp Ompraksh Raje Nimabalkar  News Latur
Shivsena Mp Ompraksh Raje Nimabalkar News Latur

निलंगा  : सध्या खारिप हंगामातील पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकाना देण्यात आल्या असल्या तरी राष्ट्रीयकृत बँकाकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. (If banks are reluctant to give peak loans, call me from there.)  खबरदार शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर, असा सज्जड दम भरतांनाच बॅंक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल तर तिथूनच मला फोन करा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

निलंगा येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांना बॅंकाकडून पीक कर्ज देण्यास होणारी टाळाटा यावर चर्चा झाली. (Shivsena Osmanabad Mp Omprakashraje Nimabalkar Apeeal to Farmer)  खासदार निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपा संदर्भात बँकांनी सरळ व सोप्या मार्गानी ठरवून दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे पिककर्ज वाटप करावे. जिरायत व बागायत क्षेत्रासाठी किती प्रमाणात कर्ज वाटप करता येते याबाबत सर्व बँकांनी त्यांच्या शाखेत दर्शनी भागात माहीती फलक लावावा.

तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकाची कर्जवाटपाची टक्केवारी अतिशय निराशाजनक असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप चांगल्या प्रकारे केले असल्याचे ते म्हणाले. शिवाय शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपासंदर्भात रिझर्व्ह व लिड बँकेकडून आदेश दिले असतानाही राष्ट्रीयकृत बँका पिककर्ज देताना शेतकऱ्यांना हेलपाटे घालायला लावत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  

प्रस्ताव द्या, निधी देतो..

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शुन्य टक्के व्याजदराने कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने खरीप हंगामासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्याचे उदिष्ट दिले आहे. नियमाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांनी व सहकारी बँकांनी त्वरित कर्जवाटप करावे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील त्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी मला एक फोन करावा, असे जाहीर आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत विविध गावचे सरपंच व कार्यकर्ते यांनी रस्ते, शिवरस्ते बाबतच्या अडचणीचा पाढा वाचला. विकास कामासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनेतून निधी कमी पडू दिला जाणार नाही, प्रस्ताव दाखल करा मी तात्काळ निधी देतो देतो अशी ग्वाही देखील निंबाळकरांनी यावेळी दिली. 

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com