अधिकाऱ्यांची खाबूगिरी सुरूच; तहसिलदारास ५५ हजाराची लाच घेतांना पकडले..

२ जुलै रोजी सायंकाळी तहसिलदार यांच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या कंत्राटी कर्मचारी सय्यद ईसा यास रंगेहाथ पकडले.
Hingoli Acb Action News
Hingoli Acb Action News

औरंगाबाद ः गेल्याच आठवड्यात भूम येथील उपविभागीय महिला अधिकाऱ्याने वाळूचे टिप्पर कुठल्याही कारवाईशिवाय सुरू ठेवण्यासाठी मध्यस्था मार्फत एक लाखाची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (The harassment of officers continues; Tehsildar caught taking bribe of Rs 55,000.)  आता हिंगोली जिल्ह्यातील सोनपेठचे तहसिलदार हे देखील वाळू प्रकरणातच ५५ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

आपापल्या विभागातील वैध, अवैध वाळू वाहतूक विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी संबंधितांकडून लाच मागण्याच्या घटना मराठवाड्यात  वारंवार घडतांना दिसत आहेत. (Acb Action In sonpeth, District Hingoli) एकापाठोपाठ लाचलूचपत विभागाच्या कारवाईत बडे अधिकारी सापडत असल्याने वाळू माफिया आणि प्रशासन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

सोनपेठ तालुक्यातील एका वाळू व्यवसायिकाकडे तहसिलदार डाॅ. आशिषकुमार बिरादार यांनी आपल्याच कार्यालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ५५ हजार लाचेची मागणी केली होती.

वाळू वाहतूक करतांना त्यावर कारवाई न करण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलूचपत विभागाच्या पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु प्रकरण हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने ही तक्रार तिकडे हस्तांतरित करण्यात आली होती.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हिंगोलीच्या पथकाने सापळा रचला आणि २ जुलै रोजी सायंकाळी तहसिलदार यांच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या कंत्राटी कर्मचारी सय्यद ईसा यास रंगेहाथ पकडले. त्यांनी दिलेल्या माहिती नंतर तहसिलदार बिरादार यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक प्रकरणात महसुल विभागाचे अधिकारी लाचलूचपतच्या जाळ्यात अडकत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com