महेबुब शेखला बलात्कारी म्हणल्याने चित्रा वाघ यांच्यावर अदखलपात्र गुन्हा..

औरंगाबाद येथील तरुणीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केल्यावरुन गुन्हा दाखल झाला होता.
Nc Filed Against Bjp Leader Chitra Wagh Beed News
Nc Filed Against Bjp Leader Chitra Wagh Beed News

बीड : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात जिल्ह्यातील शिरुर कासार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी युवका अघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी याबाबत तक्रारवजा फिर्याद दिली.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबादेत दाखल एका बलात्काराच्या प्रकरणावरून भाजपने त्यांच्याविरोधात रान उठवले होते. (Calling Mahbub Sheikh a rapist is an unsolved crime against Chitra Wagh) विशेषतः भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या त्यात आघाडीवर होत्या. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप वाघ यांनी केला होता. (Ncp Youth Leader Mehboob Saikh, Beed) रस्त्यावर उतरून आंदोलन करत मेहबूब शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी वारंवार केली होती.

चित्रा वाघ यांनी शिरुर कासारला येऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख याने एका मुलीवर बलात्कार केला व पोलिस त्यास अटक करत नाहीत. पोलिसांनी बलात्काराच्या केसमध्ये बी समरी कारवाईची घाई केली, असे म्हणून आपली बदनामी केली असे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या एका तरुणीने महेबुब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. नोकरीचे अमिष दाखवून लैंगिक शोषण केले या आरोपाखालील फिर्यादीवरुन औरंगाबादेत महेबुब शेख यांच्यावर गुन्हाही नोंद झाला होता. मात्र, तपासात पोलिसांनी बी समरी दाखल केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या चित्रा वाघ शिरुर कासार दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पुन्हा महेबुब शेख यांच्या मुद्द्याला फोडणी देण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्या गावातच त्यांनी हा उल्लेख केला. प्रकरण तपासात पोलिसांनी निकाली काढले तरी वाघ यांच्या वक्तव्यामुळे बदनामी झाली व प्रतिमा मलिन झाली, असे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com