सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीर, गुंडगिरी खपवून घेणार नाही..

सुरक्षित वातावरण मिळणार नसेल तर आम्ही आमचे उद्योग इतर राज्यात का नेऊ नये?
सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीर, गुंडगिरी खपवून घेणार नाही..
industries minister subhash deasai reaction news Aurangabad

औरंगाबाद ः औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणून नावारुपाला येत आहे, मोठ्या प्रमाणात इथे नवे उद्योग आणि गुंतवणूक येत आहे. अशावेळी उद्योजकांना गुंडाकडून होणारी मारहाण  चुकीची आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गालबोट लावणारी आहे. उद्योग क्षेत्रातील अशी गुंडगिरी कदापी खपवून घेतली जाणार नाही. (The government will not tolerate bullying with the support of entrepreneurs. Said, Industri Minister Subhash Desai) सरकार म्हणून आम्ही उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, मारहाण गुंडांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री यांनी सांगितले.

औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीतील नित्यानंद भोगले या उद्योजकांना काही गुंडाकून कंपनीत घुसून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला. ( Industri Minister Subhsh Desai, Maharashtra) त्यानंतर उद्योजकांना गुंडाकडून होणार त्रास, ब्लॅकमेलिंगचे प्रकार थांबवण्याची मागणी औद्योगिक संघटनाकडून होत आहे. सुरक्षित वातावरण मिळणार नसेल तर आम्ही आमचे उद्योग इतर राज्यात का नेऊ नये? असा संतापही या मारहाणीच्या घटनेनंतर उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

वाळूज औद्योगिक हा शहरातील सर्वात जुना व विकसित भाग आहे. शेकडो उद्योग या भागात सुरू असून औरंगाबादच्या औद्योगिक विकासात वाळूजचा सिंहाचा वाटा आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्योजकांना धमकावणे, पैशाची मागणी, ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार वाढले आहेत. वाळूजमध्ये उद्योग असलेल्या नित्यानंद भोगले यांच्या कंपनीत काही दिवसांपुर्वी पाच ते सहा गुंडांनी जाऊन त्यांना मारहाण केली होती. या प्रकारानंतर उद्योजकांमध्ये भितीचीे वातावरण होते.

या मारहाणीचा व्हिडिओ आज समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. उद्योजकांनी पोलिस आयुक्तांकडे गुंडाकडून होणारा त्रास रोखून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. शिवाय मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापर्यंत देखील पोहचला.

या मारहाण प्रकरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, देसाई यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर करवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असली तरी अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याचे समजते.

दरम्यान, उद्योजकांना गुंडाकडून झालेल्या मारहाणी संदर्भात बोलतांना सुभाष देसाई म्हणाले, हा प्रकार गंभीर आहे, औरंगाबाद सारखे शहर उद्योगात भरारी घेत असतांना, इथे मोठ्या प्रमाणात बाहेरची गुंतवणूक, कंपन्या येत असतांना अशा गुंडगिरीच्या प्रकारामुळे या प्रक्रियेला गालबोट लागू शकते. उद्योजकांना चांगले वातावरण मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे.

त्यामुळे उद्योग क्षेत्रात अशा गुंडगिरीला  अद्याप थारा दिला जाणार नाही. उद्योगपतींना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. शिवाय लवकरच औरंगाबादला जाऊन मी उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी, मागण्या जाणून घेणार  असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in