ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, झोपणारही नाही

देशमुख यांचा कोणताही दोष नाही हेआता पूर्णपणे सिद्ध झाले आहे. उलट त्यांच्यांवर आरोप करणाऱ्यांवरच तुरुंगात जाण्याची पाळी हळू यायला लागली आहे.
Ncp Leader Jayant Patil -Fadnvis News latur
Ncp Leader Jayant Patil -Fadnvis News latur

लातूर ः देशात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व एजन्सिज वापरण्याचे काम चालतं.  आता मधल्या काळात त्यांच्यावर छापेमारी झाली काही सापडलं नाही,आता पुन्हा कुणाच्या समाधानासाठी ईडीची छापेमारी चालली आहे हे कळत नाही. पण मला खात्री आहे. (The government will not rest or sleep until the OBCs get reservations) अनिल देशमुख कोणत्याही चौकशी, छापेमारीतून स्वच्छपणे बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  व्यक्त केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही, झोपणारही नाही, असा टोला देखील पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

देशमुख यांचा कोणताही दोष नाही हेआता पूर्णपणे सिद्ध झाले आहे.  उलट त्यांच्यांवर आरोप करणाऱ्यांवरच  तुरुंगात जाण्याची पाळी हळू यायला लागली आहे, असा चिमटाही पाटील यांनी भाजपला काढला. (Ncp State President Jayant Patil)  परिवार संवादच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर असलेले जयंत पाटील आज लातूर जिल्ह्यात होते. (Bjp Leader Devendra Fadanvis) औसा येथील विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना जयंत पाटील यांनी राज्यातील सद्यस्थिती, मराठा, ओबीसी आरक्षण ते केंद्र सरकारकडून सीबीआय, ईडीसारख्या एजन्सीचा सुरू असलेला वापर यावर आपली भूमिका स्पष्ट केली. जयंत पाटील म्हणाले,  राज्यात महाविकास आघाडीत नाराजी असल्याचा सूर नेहमीच लावला जातो. पण आजतागायत महाविकास आघाडीत सर्वजण एकत्र असून उत्तम काम करत आहेत. प्रत्येक पक्षाला स्वतः चा पक्ष बळकट करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोण काय बोलतो, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केले आहे.  यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे.  यावर भाजपाचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत  ओबीसी समाजाला राज्य सरकारला आरक्षण मिळवून देत नाही, तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही, असं म्हटलं आहे. याकडे लक्ष वेधले असता, भाजपनं आम्हाला शिकवू नये असा, टोला जयंत पाटलांनी लगावला.

जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्य सरकारही स्वस्थ बसणार नाही व झोपणार देखील नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.  मराठा समाजाच आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे, यास महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. त्याला फडणवीस हे मराठा समाजाला उचकवण्याचं काम करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाले, यामुळे नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली आहे. याबाबत संसदेत कायदा करून घटनेत दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. जर यावर केंद्र सरकारने घटनेत दुरुस्ती केली, तर नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संपेल असे सांगत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलवला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com