सरकार भित्रे, पडण्याच्या भितीने चर्चेपासून पळ काढत आहे: मेटेंचा हल्लाबोल..

केवळ तांत्रिक पुर्तता म्हणून हे पावसाळी अधिवेशनघेण्याचा सोपस्कार सरकारकडून पार पाडला जात आहे.
Mla vinayk mete press news Mumbai
Mla vinayk mete press news Mumbai

मुंबई ः मराठा आरक्षण हा समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि आमच्या मुला-बाळांच्या शिक्षण, नोकरी आणि भविष्याचा प्रश्न आहे. यावर सरकारने राजकारण करू नये. पण सरकार पडेल या भितीमुळे ते चर्चेपासून पळ काढतायेत, असा आरोप मराठा संघर्ष क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.  (The government is running away from the discussion for fear of falling ) मुंबईत आयोजित मोटारसाकल रॅलीच्या निमित्ताने ते बोलत होते.

मराठा आरक्षणाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये मोटारसायकर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (Maratha Reservation) भर पावसात देखील या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलतांना विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना हे सरकार पडण्याच्या भितीने अधिवेशनापासून पळ काढत असल्याचे म्हटले आहे. (Maratha Sangahrsh Kranti Morcha)

मेटे म्हणाले, विधीमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडता आला असता, त्यावर सविस्तर चर्चा करता आली असती. (Mla Vinayk Mete) पण सरकाला सातत्याने हे सरकार पडते की काय? अशी भिती सतावते आहे, हे सरकार भित्रे आहे, त्यांना चर्चाच करायची नसल्याने केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. यात पहिला दिवस शोक प्रस्तावावरील चर्चेत जाईल, मग एका दिवसात जनतेचे, मराठा समाजाचे कोणते प्रश्न मांडले जातील किंवा त्यावर चर्चा होईल?

त्यामुळे केवळ तांत्रिक पुर्तता म्हणून हे पावसाळी अधिवेशन घेण्याचा सोपस्कार सरकारकडून पार पाडला जात आहे.  मराठा आरक्षण तर मिळालेच पाहिजे, पण ते मिळत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला ज्या सोयी-सुविधा, सवलती आहेत, त्या तरी मराठा समाजाला द्या, अशी मागणीही मेटे यांनी केली. 

मराठा आरक्षणा संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोटारसायक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दहा हजाराहून अधिक तरूण-तरूणी आणि समाजाचे लोक या बाईक रॅलीत सहभागी झाल्याचा दावा देखील मेटे यांनी केला. मुंबईत काढण्यात येणाऱ्या महामोर्चाची जनजागृती करणे हा देखील यामागचा हेतू आहे.

या सरकारने कोरोनाची भिती दाखवून आंदोलन करण्यापासून रोखले. पण आम्ही नुकताच बीडमध्ये मोठा मोर्चा काढला, त्यानंतर औरंगाबादेत देखील मेळावा घेतला. समाजा आता पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. मुंबईत भर पावसात बाईक रॅलीला जो प्रतिसाद मिळाल यावरून ते स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आंदोलनाला सुरूवात झाली आहे, असेही मेटे म्हणाले.

सर्व पक्षाच्या आमदारांशी बोलू..

मराठा आरक्षणासाठी मुंबईत महामोर्चा काढण्याचे नियाेजन आहे. तत्पुर्वी मराठा व इतर समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांची एक बैठक ४ किंवा ५ जुलैला घेण्यात येणार आहे. या बैठकीत आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत, की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना या बैठकील उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.

या बैठकीत मराठा आरक्षणाचा आतापर्यंतचा संपुर्ण प्रवास, प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, भोसले समितीचा अहवाल आदींची माहिती दिली जाणार आहे. या अधिवेशानात याविषयावर चर्चा व निर्णय व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे तीनही पक्ष मराठा आरक्षणाला राजकीय रंग देण्याचा काम करत आहेत, असा आरोपही मेटे यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com