आम्हाला हवा तिथे फ्लायओव्हर द्या, कंत्राटदार, एनएचएआयची मनमानी नको..

शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करून चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाला विरोध दर्शवावा.
Mim Mp Imtiaz Jalil Demand News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil Demand News Aurangabad

औरंगाबाद ः नॅशनल हायवे आॅफ अथाॅरिटीच्या वतीने शहरातील चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाला एमआयएमने विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी पुलाची गरज नसून त्याऐवजी वाहतूक कोंडी होणाऱ्या आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी करत खासदार इम्तियाज जलील यांनी चिकलठाणा विमानतळासमोरील प्रस्तावित उड्डाणपूलाला विरोध केला आहे. (Give us flyovers where we want, contractors, don't be arbitrary of NHAI.) या संदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद शहरात ७० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. (AIMIM Mp Imtiaz Jalil) परंतु नागरिक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता चुकीच्या ठिकाणी ते उभारले जात असल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी एनएचआय व संबंधित कंत्राटदारास उड्डाणपूलाचे काम सुरू करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

या संदर्भात शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करून चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाला विरोध दर्शवावा, व त्याऐवजी आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात पूल उभारण्याची मागणी करावी, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले.

इम्तियाज जलील म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडीचे ठिकाण आणि गरज लक्षात घेऊन उड्डाणपुलांची उभारणी केली जावी. याआधी शहरात अनेक चुकीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नगर सारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात आले.औरंगाबादेत मात्र तुकड्या तुकड्यात छोटे पूल बांधण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तसाच आहे.

चिकलठाणा विमातळासमोर उड्डाणपूल उभारण्याची कल्पना कुणाच्या डोक्यातून आली, हे माहित नाही, पण आम्ही त्याला विरोध केला आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोनवेळा बैठक झाली, मात्र ते तिथेच पूल उभारण्यावर अडून बसले आहेत.

त्यांच्या अडेलतट्टू भूमिकेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोध करणार आहोतच, पण शहराचे नागरिक म्हणून प्रत्येकांनी तसेच विविध सामाजिक संस्था, औद्योगिक संघटनांनी देखील नितीन गडकरींना ट्विट करून या प्रस्तावित उड्डाणपुला ऐवजी गर्दीच्या अमरप्रीत चौक किंवा आकाशवाणीत हा पूल द्यावा, अशी मागणी करावी, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

शिवसेना, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात नितीन गडकरी यांना स्वतंत्र पत्र लिहले आहे, या शिवाय गरज भासल्यास आम्ही एकत्रितपणे सगळे नितीन गडकरी यांना भेटायला जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वक्फच्या जमीन प्रकरणात गुन्हा दाखल..

राज्यात व औरंगाबाद शहरात वक्फ बोर्डाच्या जमीनी बेकायदेशीररित्या विकल्याची अनेक प्रकरण आम्ही समोर आणली होती. ठाण्यातील बालापूर येथील एक जागा खाजगी व्यक्तीला विकण्यात आली होती. या प्रकरणात आम्ही केलेल्या पाठपुराव्यानंतर ठाणे पोलिसांनी उस्मानाबादहून हा व्यवहार करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहितीही इम्तियाज यांनी दिली.

याच धरतीवर आता औरंगाबादेतील जालना रोडवर वक्फ बोर्डाच्या जागेवर गाळे बांधून ते बेकायदेशीरपणे विकणाऱ्या रजिस्ट्री आॅफिसमधील अधिकारी,कर्मचारी व मोठे व्यापारी, बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com