''मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन''

रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत स्तुती केली आहे.
4Ramdas_20Athawale_20F_0 - Copy.jpg
4Ramdas_20Athawale_20F_0 - Copy.jpg

मुंबई  : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत स्तुती केली आहे.  Ramdas Athavale criticizes the opposition

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पवारांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. Ramdar Athavale criticizes the opposition

रामदास आठवले म्हणतात..

मोदी आहेत नंबर वन; 
विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! 
मोदी देणार आहेत सर्व 
राज्यांना विकासासाठी धन; 
जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा 
पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण!

अशा खास आपल्या काव्यमय  शैलीत विरोधकांना टोला देत तिसरी आघाडी बनली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए ला काही फरक पडणार नाही.  तिसरी आघाडी सारख्या आणखी कितीही आघाड्या बनल्या तरी मोदींच्या नेतृत्वाला काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 
''शरद पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी तयार होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राबाहेर फारसा प्रभाव नाही.  राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली तर त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. त्यामुळे तिसरी आघाडी ही एनडीएचे नव्हे तर काँग्रेसचेच नुकसान करील,'' असा दावा आठवले यांनी केला आहे. 

शरद पवार-प्रशांत किशोर यांची तिसरी भेट अन् तिसऱ्या आघाडीची चर्चा 
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पवारांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बुधवारी दिल्लीत पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मागील 15 दिवसांतील ही तिसरी बैठक असल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी मुंबईत शरद पवार यांची पहिली भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर प्रशांत किशोर व पवार यांच्यात सोमवारी पुन्हा बैठक झाली. तर मंगळवारी पवार यांच्या घरी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंच या व्यासपीठाच्या अंतर्गत ही बैठक घेण्यात आली. ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी होत असल्याची चर्चा होती. पण बैठकीतील नेत्यांनी काँग्रेसला वगळून कोणतीही तिसरी आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com