कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला विलासराव देशमुखांचे नाव द्या..

कृषी परिषदेने सदरील प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे शिफारस केली आहे. परंतु हा प्रस्ताव ७-८ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे.
mla satish Chavan letter to Minister Dada Bhuse News Auragangabad
mla satish Chavan letter to Minister Dada Bhuse News Auragangabad

औरंगाबाद ः  लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय या आधीच झालेला आहे. (Give the name of Vilasrao Deshmukh to the College of Agricultural Biotechnology.) त्या शासन आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

चव्हाण यांनी आज मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. (Agricultuer Minister Dada Bhuse) राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक यासह विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. (Ncp Mla Satish Chavan) त्यांच्या कार्याचा विचार करता लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद तसेच राज्याच्या कृषी परिषदेने २०१३ मध्ये ठराव घेऊन मान्यता दिली होती.

कृषी परिषदेने सदरील प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे शिफारस केली आहे. परंतु हा प्रस्ताव ७-८ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असून यासंदर्भात अद्यापही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याचे चव्हाण यांनी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले.  सदरील महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास मान्यता देऊन त्वरीत शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.  

या संदर्भात त्वरीत कार्यवाही केली जाईल असे, आश्वासन भुसे यांनी दिल्याचे सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे त्वरीत भरावीत अशी देखील मागणी चव्हाण यांनी या भेटीत केली.  कृषी विद्यापीठाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेऊन लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील भुसे यांनी यावेळी दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com