`माझे क्रिडा विद्यापीठ परत द्या`, म्हणत एमआयएमने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे..

क्रिडा विद्यापीठ हे संपुर्ण राज्यासाठी एकच असते. प्रत्येक जिल्ह्यात ते उभारता येत नाही, तेव्हा शिवसेनेने दिशाभूल करू नये.
`माझे क्रिडा विद्यापीठ परत द्या`, म्हणत एमआयएमने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे..
Mim protest in aurangabad news

औरंगाबाद ः राज्याला मंजुर झालेले क्रिडा विद्यापीठ औरंगाबादला मिळाले होते. त्यासाठी दीडशे एकरपैकी १३५ एकर जागा उपलब्धही करण्यात आली. परंतु अचनाक हे क्रिडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीला करण्याचा निर्णय घेण्यात आला. ("Give back my sports university," said MIM, showing black flags to the Guardian Minister.) विशेष म्हणजे मराठावाडा व विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,क्रिडा, सामाजिक संघटनांनी देखील हा अन्याय निूपटपणे सहन केला, असा आरोप करत एमआयएमने आज स्वातंत्र्यदिनीच ` माझे क्रिडा विद्यापीठ परत द्या`, असे म्हणत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्याला देखील यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले. शिवसेनेचे नेते शहरात फक्त जनतेच्या भावना भडकवण्यासाठीच येतात, औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या घोषणा करतात. (Mim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) मराठावाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर मात्र ते मूग गिळून गप्प बसतात. मराठवाड्याला मिळणाऱ्या अनेक संस्था विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पळण्यात आल्या.

आता क्रिडा विद्यापीठ देखील इथून पुण्याला हलवण्यात आले. आता हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, अशा इशारा देतांनाच यापुढील काळात क्रिडा विद्यापीठासाठीचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही याचा जाब विचारू, असेही इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले. (Gardiuan Minister Subhash Desai, Aurangabad) एमआयएमच्या या आंदोलनाने शहर आज दणाणून गेले होते. आंदोनलाचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी आधीच दिल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर तैनात केला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे मराठवाडा क्रिडा विद्यापीठासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता हे विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीला उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी देखील फडणवीस सरकारच्या काळात औरंगाबादाल मिळालेल्या मोठ्या शैक्षणिक संस्था विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात नेण्यात आल्या. मराठावाड्यावर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने अन्याय केला जातो, आणि आमचे लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसतात.

आता तर राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेना व त्यांचे लोकप्रतिनिधी मराठवाड्यावर होणार हा अन्याय निपूटपणे सहन करत आहे. मराठवाडा क्रिडा विद्यापीठ हे औरंगाबादसाठी अत्यंत महत्वाचे आणि या भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरणार होते. त्यासाठी १३५ एकर जागा याआधीच उपलब्ध करून देण्यात आली होती. उर्वरित १५ एकर जागा देखील देण्याची तयारी असतांना हे क्रिडा विद्यापीठ आता बालेवाडीला नेण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवू..

काॅमनवेल्थ स्पर्धेच्यावेळी बालेवाडी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून मोठे संकुल उभारण्यात आलेले आहे. मग पुन्हा क्रिडा विद्यापीठही तिथेच करण्याचा अट्टाहास हा आमच्यावर अन्याय करणारा आहे. आम्ही जेव्हा यासाठी आग्रह धरला तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी मला तुम्ही एवढे मनावर का घेता? औरंगाबादला देखील आणखी एक क्रिडा विद्यापीठ आपण करू, असे आश्वासन दिले.

मात्र क्रिडा विद्यापीठ हे संपुर्ण राज्यासाठी एकच असते. प्रत्येक जिल्ह्यात ते उभारता येत नाही, तेव्हा शिवसेनेने दिशाभूल करू नये. आमचे क्रिडा विद्यापीठ परत द्या, या मागणीसाठी आज आंदोलन केले आहे. यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. पालकमंत्र्यांना आज काळे झेंडे दाखवले, यापुढे मुख्यमंत्र्यांनाही दाखवू, असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला.

Edited By :Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in