गडकरींचा लेटरबॅाम्ब : भावना गवळी म्हणातात...केंद्रीय मंत्र्यांची कोणितरी दिशाभूल करतेय!  

गडकरी यांच्या पत्रानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Nitin Gadkari, Bhavana Gawli .jpg
Nitin Gadkari, Bhavana Gawli .jpg

वाशिम : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करीत असलेल्या ठेकेदारांना शिवसेनेचे Shivsena काही पदाधिकारी धमकावत आहेत आणि काम बंद करण्यास सांगत आहेत. सुरू असलेली कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यात आल्यास महाराष्ट्राचे व जनतेचे नुकसान होईल. आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना पाठविले आहे. यावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Bhavana Gawli said that someone is misleading the Union Ministers)  

गडकरी यांच्या पत्रानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून वाशिम लोकसभा मतदार संघाचा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील 90 टक्के नॅशनल हायवे चे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मला कुठलाही विचारणा झाली नाही. नॅशनल हायवेचा विषय असल्यामुळे मी गडकरी यांना भेटून सगळ्या गोष्टी सांगणार, असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.   

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात गडकरी पत्रात म्हणतात, राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गांचे काम करताना अडचणी येत आहेत. तसेच काही ठिकाणचे स्थानिक नेते या कामात अडथळा आणत आहेत. त्यांनी हे पत्र २७ जुलैला लिहिले असून अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबद्दल लिहिले आहे. 

त्याबरोबर मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच इतरही काही रस्ते त्यांनी नमूद केले आहे. तिकडचे स्थानिक नेते मंडळी या कामामध्ये अडथळा आणत असून स्थानिक पातळीच्या राजकारण आडवे येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील सेनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे गडकरींनी सांगितले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com