माजी आमदाराचा मुलगा-नातू पुरात वाहून गेले; चोवीस तासानंतर मृतदेह सापडले..
Heavy rain In Nanded News

माजी आमदाराचा मुलगा-नातू पुरात वाहून गेले; चोवीस तासानंतर मृतदेह सापडले..

भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदीप हे दोघे कारने जात असतांना ही दुर्दैवी घटना मोती नाल्याजवळ घडली.

नांदेड ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यातील मुखेड जवळ काल  मोती नाल्यास आलेल्या पुरात  एक कार वाहून गेली होती. या कारमध्ये मुखेडचे माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा व नातू होते. (The former MLA's son and grandson were swept away in the floods; Twenty-four hours later, the bodies were found.) चोवीस तासांच्या प्रयत्नानंतर या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.

भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदीप हे दोघे कारने जात असतांना ही दुर्दैवी घटना मोती नाल्याजवळ घडली. कारमधील एकाने झाडाचा आधार घेतल्याने त्याला  मदत पथकाने दोरीच्या साह्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले आहे. (Heavy Rain In Nanded District) पुरात वाहून गेलेले पिता पुत्र हे मुखेडचे माजी आमदार किशनराव राठोड यांचा मुलगा आणि नातू आहेत.

भगवान राठोड (वय  ६५ ) तसेच मुलगा संदिप राठोड ( वय ३८ ) अशी  वाहून गेलेल्यांची नावे आहेत.  काल सकाळपासून  या पिता-पुत्राचा आपत्ती व्यवस्थापन पथक शोध घेत होते. पण चोवीस तास उलटून गेले तरीही त्यांचा शोध लागला  नव्हता.

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथुन पिता-पुत्र नोकर उद्धव देवकते याला घेवून कारने कमळेवाडी येथून पांडुर्णी मार्गे मुखेडकडे येत होते. सकाळी कार मुखेडनजीक असलेल्या मोती नाल्याजवळ आली असता,  संदिप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्याने पुलावरू कार नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली.

बचाव पथकाला वाहून गेलेली कार सापडली होती, मात्र राठोड पिता-पुत्र सापडले नव्हते. दरम्यान, रात्र झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान आज, वाहून गेलेल्या या पिता- पुत्रांचा मृतदेह सापडला आहे.  नाल्यापासून ५०० मिटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले असून भगवान राठोड आणि संदीप राठोड यांचेच ते असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in