मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार; १२ मृत्यू तर ४१ घरांची पडझड..

सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी झाली असून जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० एकरवरील ऊस आडवा झाला आहे.
Heavy Rain In Marathwada News
Heavy Rain In Marathwada News

औरंगाबाद ः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी व जोरदार पावसाने जीवत तसेच मालमत्तेची हानी झाल्याची माहिती आहे.  गेल्या चार दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत बारा मृत्यूची नोंद झाली आहे. (Hahakar due to heavy rains in Marathwada; 12 deaths and 41 houses collapsed.) तर ४१ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

एकूण बारा मृत्यूपैकी नांदेडमध्ये ३, बीड-४, औरंगाबाद-२, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर  साडेसहाशेहून अधिक लहान मोठी जनावरे दगवली आहेत. (Heavy Rain In Marathwada) यात जालना जिल्ह्यातील ५९८ कोंबड्यांचा देखील समावेश आहे.  तर ४१ घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

४ आणि ५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ८५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ६ सप्टेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील १६ मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे.  ७ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ५० महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

गेल्या चार दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. जालन्यातील १८, बीड-३९, लातूर-१०, उस्मानाबाद जिल्ह्यातील १६, नांदेड जिल्ह्यातील-२९, परभणी जिल्ह्यातील २२,  तर हिंगोलीत २१ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं दाणादाण उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या.

लातूरमध्ये ऊस आडवा..

लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी झाली असून जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० एकरवरील ऊस आडवा झाला आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली शिवारातील दोन पाझर तलाव फुटल्याने त्याचे पाणी गावात शिरले आणि यात अनेक जनावरे वाहून गेली. तिरु नदीची पाणी पातळी देखील वाढली असून जळकोट तालुक्यातील काही गावाचा संपर्क तुटला आहे. रेणा मध्यम प्रकल्प तीन वर्षा नंतर शंभर टक्के भरला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाडी धरण ३१ आँगस्टला ओव्हरफ्लो झाले. यामुळे शिवना टाकळी प्रकल्पात येणाऱ्या सर्व नदीवरील छोटे-मोठे कोल्हापूर बंधारे ओसंडून वाहत आहे. दरम्यान, यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठा १.३९ टिएमसी क्षमता असलेला शिवना टाकळी हा सिंचन प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दररोज कमालीची वाढ असल्याने आज रोजी शिवना टाकळी सिंचन प्रकल्पाचा पाणीसाठा ८६.३२ टक्कावर आला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com