दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश प्रकरणाची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी..

वेबसाईट सुरू झाली तरी वांरवार ती बंद पडत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
Education Minister Varsha Gaikwad News Mumbai
Education Minister Varsha Gaikwad News Mumbai

औरंगाबाद ः शिक्षण विभागाने दहावीचा निकाल शनिवारी दुपारी एक वाजता जाहीर केला. मात्र वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सांयकाळपर्यंत निकाल पाहताच आला नाही. रात्री उशीरा वेबसाईट सुरू झाली तरी वांरवार ती बंद पडत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. (A five-member committee is investigating the website crash case of the 10th verdict.) शिक्षण विभागाची देखील यामुळे नाचक्की झाली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून यासाठी पाच सदस्यीय चौकशी स्थापन करण्यात आली आहे. आता या संपुर्ण प्रकरणाची चौकशी या समितीमार्फत केली जाणार आहे.( Education Minister Varsha Gaikwad Maharashtra)

या समितीच्या अध्यक्षपदी  महाराष्ट्र शिक्षण विभागाचे आयुक्त, पुणे  यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून  सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे प्रतिनिधी, उपसचिव (उद्योग), उद्योग उर्जा व कामगार विभाग,मंत्रालय,  तांत्रिक सल्लागार, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,मंत्रालय,मुंबई,  उपसंचालक (प्रशासन), आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय सचिव यांचा समोवश करण्यात आला आहे.  या समितीने आपला अहवाल १५ दिवसात शासनास सादर करायाचा आहे

या बाबी तपासल्या जाणार..

- निकालापूर्वी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी सर्व सबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती किंवा कसे?

- निकाल घोषित करण्यासंबंधात राज्य मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?

- संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधीत कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत
पूर्वसूचना देण्यात आली होती का? 

- इयत्ता १० वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पूर्व तपासणी (Trial run) करण्यात आली होती का? ४.

- निकाल घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या सर्वरचा (Server) वापर
करण्यात आला होता का? 

- भविष्यात अशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाय योजना सूचित करणे...

- राज्यमंडळाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जबाबदार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com