स्वबळाची पुन्हा डरकाळी, पुढील सगळ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवाच; सुभाष देसाईंची घोषणा 

लोकांचा शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले.
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad

औरंगाबाद ः शिवसेना राजकारणात सातत्याने सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवत आहे. यापुढे देखील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीत (Fear of self-reliance again, Shiv Sena's saffron in all next elections; Announcement by Subhash Desai) देखील भगवाच फडकेल असा, विश्वास व्यक्त करत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेच्या ३६ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शिवसैनिकांच्या व्हर्च्युल मेळाव्याला मार्गदर्शन करतांना देसाई यांनी स्वबळाचा नारा दिला. (36th Anniversary of the first Shiv Sena branch in Marathwada) राज्यात तीन पक्षाचे महाविका आघाडी सरकार सत्तेवर येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एक धोरण म्हणून यापुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी करून एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

काही निवडणुकींमध्ये याची अंमलबजावणी देखील झाली. परंतु आता तीन्ही पक्षांनी आघाडी ऐवजी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. शिवसेना, काॅंग्रेसच्या नेत्यांनी तर या संदर्भात जाहीरपणे आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना औरंगाबाद शाखेचा ३६ वा वर्धापनदिन काल साजरा झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Gaurdian Minister Subhash Desai) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मराठवाड्यातील शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना या निमित्ताने व्हर्च्युल मेळाव्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सुभाष देसाई यांनी शिवसेनेने मराठवाडा, औरंगाबाद व राज्यात केलेल्या विकास व सामाजिक कामांची माहिती दिली.

औरंगाबाद शहराचा विचार केला तर सोळाशे कोटींची पाणीपुरवठा योजना, रस्ते, स्मार्टसिटी, शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसीमध्ये वाढत असलेली गुंतवणूक अशा प्रमुख गोष्टींचा उल्लेख केला. कोरोना काळात शिवसेनेने सर्वसामान्यांना केलेली मदत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली खंबीर साथ या जोरावरच आपण राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकलो.

जिल्हा बॅंक ताब्यात घेतली..

विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात शिवसेनेचे वाघ आपण निवडून पाठवले. लोकांचा शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत देखील आपण यश मिळवत ती ताब्यात घेतली.

आता यापुढे देखील येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकला पाहिजे,या दृष्टीने शिवसैनिकांने झोकून देत काम करावे, असे आवाहन देखील सुभाष देसाई यांनी केले. आगामी महापालिका निवडणुका पाहता पालकमंत्री देसाई यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com