महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले... 

लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्लेषण करुन काम करत असतात.
  Aditya Thackeray .jpg
Aditya Thackeray .jpg

मुंबई : महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही अशी टीका सातत्याने भाजपकडून (Bjp) केली जाते. हे सरकार स्वत:च्या वजनानेच पडेल अशी टीका होते असते. मात्र,  ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) उत्तर दिले. (State government will last for five years: Aditya Thackeray)

यामुलाखतील आदित्या ठाकरे म्हणाले, ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का?, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. हे तीन पक्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये वाद असल्याचे दावे केले जात असल्यासंदर्भात बोलताना, तुम्ही ज्याला वाद म्हणत आहात तो मला वाद वाटत नाही. तीन पक्षांचे सरकार आहे, चर्चा होत राहतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्लेषण करुन काम करत असतात. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता येते. असे झाल्यास केवळ पाच वर्षे नाही, तर पुढेही आम्ही एकत्र राहून सेवा करत राहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला अनेक चेहरे (नेतृत्व) असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षाला अशा टीकेवर उत्तर देण्याऐवजी आम्ही काम करत राहणे जास्त योग्य ठरेल. मुख्यमंत्री सर्वांचा सल्ला घेतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांविरोधात सुरु असणाऱ्या चौकशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सध्या तपास सुरु असल्याने काही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. प्रकरण न्यायाप्रविष्ठ असल्याने काही भाष्य करणे अयोग्य ठरेल, असे आदित्य म्हणाले. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com