पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या दानवेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा..

शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे एवढे मोठे जाळे आहे, की आम्हाला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते फोडण्याची कधीच गरज भासत नाही.
Shivsena Leader Arjun Khotkar- Raosaheb Danve News Jalna
Shivsena Leader Arjun Khotkar- Raosaheb Danve News Jalna

जालना ः पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्याच मतदारसंघात करत आहेत. पत्रकार हल्ल्यातील आरोपींना शोधण्यासाठी जाफ्राबाद मधील भाजप कार्यालयात गेलेल्या पोलिसांना रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबाव आणत निलंबित करायला लावलं. (Expel the Raosaheb Danve from the cabinet who are mentally abusing the police.) मात्र  मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसमोर खरी परिस्थिती आम्ही मांडली आणि पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी सांगितले. रावसाहेब दानवे हे पोलिसांचे मानसीक खच्चीकरण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील  खोतकर यांनी केली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र आणि त्यातील आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Shivsena Leader Arjun Khotkar) यावर दावे- प्रतिदावे केले जात असतांना शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया व्यक्त केली.

खोतकर म्हणाले, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेने भाजपचे कार्यकर्ते फोडल्याचा दावा केला आहे. पण शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे एवढे मोठे जाळे आहे, की आम्हाला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते फोडण्याची कधीच गरज भासत नाही.

गल्ली गल्लीत आमचे कार्यकर्ते आहेत. या उलट भाजप हा पक्षच इतर पक्षांमधून फोडोफोडी केलेल्यांच्या जीवावर सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात कधीही स्फोट होऊ शकतो.  हर्षवर्धन जाधव यांचे वाढदिवसा निमित्त जालन्यात लागलेल्या पोस्टरवरही खोतकरांनी मत व्यक्त केले. आजकाल गल्लोगल्ली कुणाचेही पोस्टर लागतात. त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पण माझ्या त्यांना वाढदिवासनिमित्त शुभेच्छा आहेत.

राहिला प्रश्न ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? तर लोकशाहीत प्रत्येकाला कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे जाधव हे देखील लढवू शकतात, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले. राज्यात सर्वच पक्षांकडून स्वबळाची भाषा केली जात आहे.

शिवसेना वर्धापनदिनाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करत शिवसैनिकांना कानपिचक्या दिल्या, यावर मुख्यमंत्र्यांचा दृष्टीकोन या संदर्भात एकदम स्पष्ट आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांनी कुणाला कानपिचक्या देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही खोतकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com