दोषी नसेल तर पुन्हा जबादारी द्या, माजी मंत्री संजय राठोड यांची मागणी..

कोरोनाचे संकट व इतर बाबींमुळे माझ्या बाबतीतला अहवाल अजून मुख्यमंत्र्यांकडे गेला नसावा. तो जेव्हा त्यांच्याकडे जाईल तेव्हा ते योग्य निर्णय घेतील.
Ex.Forest Minister Sanjay Rathod News Jalna
Ex.Forest Minister Sanjay Rathod News Jalna

जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीती आरक्षण रद्द झाले आहे. या निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. या शिवाय विमुक्त भटके समाजातील भरती प्रक्रिया, ७ मे च्या अद्यादेशानूसार रखडलेली पदोन्नती, क्रिमिलियर असे अनेक समाजाचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. (If not guilty, give responsibility again, demands of former minister Sanjay Rathore) यावर चर्चा आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालन्यात आलो होतो, असे स्पष्ट करत माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्यावर अन्याय झाला असून चौकशी शिवाय फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचा पुनरुच्चार केला.

मी दोषी असेन तर मरा शिक्षा द्या, नाही तर पुर्वीप्रमाणे काम करू द्या, अशी मागणी देखील यावेळी राठोड यांनी केली. (Ex. Minister Sanjay Rathod) ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राठोड यांनी विमुक्त भटक्या समाजासह इतरांची बैठक घेत या विषयावंर सविस्तर चर्चा केली. (Cm Uddhav Thackeray) बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेले पत्र, पूजा चव्हाण प्रकरणात चौकशी न करता शिक्षा देण्याचा आपल्या बाबतीत झालेला प्रकार ते काॅंग्रेसच्या स्वबळाबद्दल आपली भूमिका मांडली.

राठोड म्हणाले, प्रताप सरनाईक यांनी नेमकं पत्रात काय म्हटंल आहे, हे आपण दौऱ्यावर असल्यामुळे पाहिलेलं नाही. माझी त्यांची प्रत्यक्ष भेट होईल तेव्हाच या विषयावर बोलणे योग्य ठरेल. पण एखाद्याची चौकशी न करता त्याला फाशी देण्याचा प्रकार बरोबर नाही. माझ्या बाबतीत जे घडले ते देखील असेच होते. माझ्यावर आरोप झाल्यानंतर लगेच मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

माझी सुरूवातीपासूनची मागणी हीच होती की, आधी चौकशी करा, त्या दोषी आढळलो तर मला हवी ती शिक्षा करा. पण चौकशी न करता फासावर देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला. कोरोनाचे संकट व इतर बाबींमुळे माझ्या बाबतीतला अहवाल अजून मुख्यमंत्र्यांकडे गेला नसावा. तो जेव्हा त्यांच्याकडे जाईल तेव्हा ते योग्य निर्णय घेतील. दोषी असेल तर शिक्षा द्या, नाहीतर पुन्हा जबाबदारी सोपवा या मागणीवर आपण ठाम आहोत असे देखील राठोड म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. त्यामुळे कुणी स्वबळाची भाषा केली तरी त्यात काही गैर नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी या संदर्भात अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रत्येकाला आपला पक्ष बळकट करण्याचा अधिकार आहे. आणि जर तो कुणी करत असेल तर त्यात काही चूकीचे नाही, त्याला स्वबळ म्हणणे योग्य नाही, असेही राठोड म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com