विशिष्ट भागात सूट, अन्य ठिकाणी कारवाईचा दंडुका हे खपवून घेणार नाही.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम सगळ्यांना सारखे लावा, काही भागात नियमांचे उल्लंघन होत आहे.
Shivsena leader Chandrkant Khaire Ltter to Collector News
Shivsena leader Chandrkant Khaire Ltter to Collector News

औरंगाबाद : रमझानच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमध्ये कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. कडक निर्बंध आणि लाॅकडाऊन असतांना धोकादायक पद्धतीने गर्दी जमवून मालाची विक्री केली जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. (Discounts in certain areas, action sticks in other places will not be tolerated, Shivsena Leader Chandrakant Khaire Letter to Collector). जिल्हा प्रशासनाने या संदर्भात संबंधित दुकानदारांवर गुन्हे देखील दाखल केले. मात्र यावरू आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रशासनाकडून विशिष्ट भागाला सूट दिली जात असल्याचा आरोप करत सर्वांना नियम सारखे लावा, अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना व व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन आपल्या तक्रारी व मागण्याचे निवेदन दिले. या निवदेनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात कोरोनाविरोधात जबरदस्त लढा दिला आहे.(Chief Minister Uddhav Thackeray has given a strong fight against Corona) तसेच कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे.  

परंतु औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम सगळ्यांना सारखे लावा, काही भागात नियमांचे उल्लंघन होत आहे. शहर व ग्रामीण भागात आरोग्य सेवा व कर्मचारी कमी पडत असल्याने याबाबी गांभीर्याने घ्याव्यात. कठोर नियम फक्त शहरात हिंदुबहुल भागातच होत असल्याचे चित्र आहे. (Strict rules are being implemented only in Hindu-dominated areas of the city.)  फक्त याच भागातील व्यापारी व प्रतिष्ठाणे यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन दंड वसुल करुन त्यांच्या दुकानांना सिल करण्यात आले आहे.

यामुळे व्यापारयांमध्ये प्रचंड नाराजी असून विशिष्ट भागात खरेदीच्या नावाखाली जमावाने विना मास्क फिरुन एका अर्थाने कोरोना संसर्ग वाढीला चालनाच दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. वास्तविक पाहता शहरातील सर्व हिंदु बांधवांनी या वर्षभरात झालेले सर्व सण गुढीपाडवा असेल, रामनवमी, हनुमानजयंती, भिमजयंती, महावीर जयंती, महाराणा प्रताप जयंती हे सर्व उत्सव घरातुनच साजरे केलेले आहेत.

अनेक प्रार्थनास्थळे उघडी..

तरी पण प्रत्येक मंदिराच्या परिसरात प्रचंड पोलीसांचा बंदोबस्त, ताफा लावून जर एखादा भाविक चुकुन मंदिर परिसरात आला तर, त्याला धमाकवून परत पाठविले जाते, हे प्रकार पाहुन आश्चर्य वाटते. त्या उलट शहरातील काही विशिष्ट भागात विशिष्ट धर्माची प्रार्थनास्थळे मोठ्या प्रमाणाावर सुरु असुन ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

या ठिकाणी प्रार्थना स्थळांकडे जातांना येतांना प्रचंड गर्दी असते तसेच मास्कचा वापर नाही, सामाजिक अंतराचे पालन नाही हे कृत्य कितपत योग्य आहे असा प्रश्न आम्हा नियम पाळणाऱ्या नागरिकांना पडला आहे. याची शहानिशा करुन सर्वांना समान न्याय असला पाहिजे. (If the administration intends to impose lockdown, then this decision should be taken with the confidence of traders.) भविष्यात १५ मेनंतर जर लॉकडाऊन लावण्याचा प्रशासनाचा विचार असेल अथवा तसे नियोजन असेल तर सर्व स्तरावरील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा, असे देखील या निवदेनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच छुप्या मार्गाने दुकानांमधुन जो व्यापार सुरु आहे. तो थांबविण्यात यावा, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करतांना नियम सर्वांना सारखेच असावेत. कार्यवाही करत असतांना समान न्याय असावा. प्रशासनाच्या वतीने लागु करण्यात आलेला कडक लॉकडाऊन हा दुजाभाव करण्यासारखा प्रकार असल्याने, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे.

Edited By : Jagdish pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com