उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरात उडी घेऊन वाचवले दोन तरुणांचे प्राण..

अर्जुन तमलवाड आणि धम्मपाल कसबे हे दोन तरुण २३ जुलै रोजी बैल चारण्यासाठी गावातील काळडोह नदी पलिकडे गेले होते. मात्र, पावसाचा जोर वाढला आणि नदीला पूर आला.
Deputy Collector Nanded-Bhokar-flood News
Deputy Collector Nanded-Bhokar-flood News

नांदेड ः राज्यात सध्या सर्वत्र पाऊस, अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. या पुराने पीकांचे नूकसान, घराची पडझड तर झालीच पण अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहे. पण अशा संकटाच्या काळातही प्रशासनातील एखादा अधिकारी आपल्या जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण कसे वाचवतो हे भोकर तालुक्याती जामधरी गावात दिसून आले. (Deputy Collector jumps into flood and saves lives of two youths) पुरात अडकलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी स्वतः पुरात उडी घेऊन या दोघांना वाचवले.

पुरातून सहीसलामत बाहेर आल्यानंतर या तरूणांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे हात जोडत आभार तर मानलेच पण तुम्ही आमच्यासाठी देवदूत म्हणून आलात, अशा भावना देखील व्यक्त केल्या. (Deputy Collector Nanded-Bhokar)भोकर तालुक्यातील जामधरी येथील या थरारक घटनेत दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवण्यात आली होती.

अर्जुन तमलवाड आणि धम्मपाल कसबे हे दोन तरुण  २३ जुलै रोजी बैल चारण्यासाठी गावातील काळडोह नदी पलिकडे गेले होते. मात्र, पावसाचा जोर वाढला आणि नदीला पूर आला, त्यामुळे नदीपलीकडेच अडकले. भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी जामधरीकडे धाव घेतली. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या काही तरुणांना सोबत घेतले आणि ते नदीच्या काठावर गेले. पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने पलीकडे अडकलेल्या तरूणांना गावात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

मोहिम फत्ते करूनच परतले..

तरुण बिथरलेले होते, त्यांना धीर देण्याची गरज होती.  तेव्हा उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी पुरात उडी घेऊन तरुण अडकेलेला काठ गाठला. सोबत काही तरूणांना घेतले. नदीच्या काठावरील एखाद्या झाडाला दोरी बांधून या तरूणांना सुरक्षित नेण्याचा निर्णय झाला. तीन चार ठिकाणी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. मग एका ठिकाणी झाडाला दोर बांधून तो दुसऱ्या काठावर उभ्या असलेल्या गावकऱ्यांपर्यंत नेण्यात आला.

अडकलेल्या दोन्ही तरूणांना हिमंत देत उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी त्यांना लाईफ जॅकेट घातले, स्वतःही ते परिधान केले आणि काही तरुणांच्या मदतीने या दोघांना नदीपार करून गावात नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुपारी सुरू केलेले प्रयत्न रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. बचाव कार्यांत अंधाराचा अडथळा नको म्हणून ट्रॅकटरचे लाईट सुरू करण्यात आले. दुपारपासून सुरू असलेल्या बचाव कार्यालाल रात्री उशीरा अखेर यश आले.

विशेष म्हणजे खंदारे यांनी ही मोहिम फत्ते केल्यावच नदीकाठ सोडला. दोन्ही तरुणांना सुखरूप नदीच्या काठावर आणल्यानंतर खंदारे यांच्यासह मदत कार्यात सहभागी युवकांनी व गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. खंदारे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून पुरात अडकलेल्या तरुणांसाठी ते देवदूत ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com