...अन् अजित पवारांनी घेतला फिरत्या गाडीवरील गुळाच्या चहाचा आस्वाद

आज महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

बारामती : कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही शक्य होत नाही. त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही उदघाटन पवार करतात आणि त्याच्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतात. बारामतीत आज (ता. 25 जुलै) हा प्रसंग घडला. (Deputy Chief Minister Ajit Pawar tastes organic jaggery tea) 

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'आपला हक्क आपला व्यवसाय' या उपक्रमाच्या माध्यमातू फिरत्या चहा विक्रीच्या दुकानाची सुरवात केली. महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते. त्या वेळेस तुषार यांनी पवार यांच्याकडे आपल्या या छोट्याशा व्यवसायाचे उदघाटन तुम्ही करावे, अशी इच्छा व्यक्त केली. 

क्षणाचाही विलंब न करता अजित पवार लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ गेले, आणि त्यांनी फीत कापून उदघाटन केले. त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला. तेवढ्या वेळात त्यांनी व्यवसाय व त्याच्याविषयी चौकशी केली. पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही. ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात व कार्यकर्त्यांचे मन राखतात याचा प्रत्यय या छोट्याशा घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला. 

आपल्या दुकानाचे उदघाटन स्वताः पवार यांनी केल्याचा आनंद तुषार याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा, अशा सदिच्छाही पवार यांनी त्याला दिल्या. 

दरम्यान, अजित पवार पूरग्रस्त भागांचा सोमवारी (ता.26 जुलै) दौरा करणार आहेत. पवार यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पावसाने थैमान घातल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दरडी कोसळून मृत्यू झालेले असून परिस्थिती भयाण बनली आहे. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पूरग्रस्त भागांचा दौरा केला होता. पवार हेही आता पूरग्रस्त भागांचा दौरा करुन त्या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तातडीने सरकारी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वताः पवार या भागाचा दौरा करणार असून प्रशासनाला सूचना देणार आहेत. आज बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान या पूरस्थितीबाबत माहिती दिल्यानंतर आपण या भागाचा दौरा सोमवारी करणार असल्याचे पवार यांनी जाहिर केले. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com