सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; त्याच डॉ. साबळेंना सिव्हील सर्जनपद - Demand to report a felony homicide; The same Dr. Sable to the post of Civil Surgeon | Politics Marathi News - Sarkarnama

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; त्याच डॉ. साबळेंना सिव्हील सर्जनपद

दत्ता देशमुख
गुरुवार, 10 जून 2021

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मिरा एखंडे या महिलेचा दहाव्या बाळंतपणावेळी मृत्यू झाला. त्यावेळी विरोधीपक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी थेट डॉ. साबळे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

बीड : काळाचा महिमा अगाध असतो, त्यात राजकारणात तर नेत्यांची कधी कोणावर खप्पा मर्जी होईल आणि कधी कोणाला कडेवर जागा भेटेल हे सांगणे कठीण. असाच काहीसा प्रकार डॉ. सुरेश साबळे यांच्याबाबत घडला आहे. (Demand to report a felony homicide; The same Dr. Sable to the post of Civil Surgeon) धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना साबळे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी थेट पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्याच डॉ. साबळे यांना मुंडे पालकमंत्री असलेल्या त्यांच्याच जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकीत्सक या पदावर बसण्याचा मान मिळाला आहे.

विशेष म्हणजे ज्या डॉ. साबळेंबद्दल पुर्वी कायम तक्रारी करणारे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना हा पदभार मिळावा यासाठी आता राजकीय वजन खर्ची केले. (Minister Dhnanjay Munde)
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे मानली जातात. यातल्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक पदांवर अद्याप जिल्ह्याच्या ठिकाणी कोण्या भूमिपुत्राला संधी मिळाली नाही.

पण, जिल्हा शल्यचिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या खुर्चींचा मान अनेक जिल्ह्यातील भुमिपुत्रांना मिळाला. अलिकडच्या काळात सलग चार जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्ह्याचेच भूमिपुत्र आहेत. (Mla Prakash Solunke) त्यात डॉ. नागेश चव्हाण, त्यांच्यानंतर डॉ. अशोक थोरात, त्यांच्यानंतरचे डॉ. सुर्यकांत गित्ते व आता डॉ. सुरेश साबळे ही सर्व मंडळी जिल्ह्याचेच भुमिपुत्र. त्यामुळे या पदांवर मर्जीतल्या अधिकाऱ्यांना बसविण्यासाठी सहाजिक राजकीय प्रतिष्ठा आणि वजनही तेवढेच गरजेचे असते.

डॉ. नागेश चव्हाण यांना कोणी राजकीय गॉडफादर नसल्याने त्यांची जळगावला याच पदावर बदली झाली. तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले वजन डॉ. थोरात यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांना ही खुर्ची मिळाली. विशेष म्हणजे डॉ. थोरात यांच्याबाबतही तत्कालिन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. पण, पुन्हा तेच मुंडे पालकमंत्री झाले.

काही दिवसांनीच कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाली. जिल्हा नियोजन समितीचा कोट्यावधींचा निधी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या अधिपत्याखालील आरोग्य विभागाला वर्ग झाला. या निधीचा विनियोग होईपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. पुढे अचानक डॉ. थोरात यांच्याजागी डॉ. गित्ते यांची बदली झाली. विशेष म्हणजे डॉ. थोरात यांना चार महिने पदाविना राहवे लागले. अखेर दोन महिन्यांपूर्वी त्यांना नाशिकचे जिल्हा शल्यचिकीत्सकपद मिळाले आहे.

आता अतिरिक्त पदभाराच्या निमित्ताने का होईना पण या पदाचा सन्मान डॉ. साबळेंना मिळाला आहे. पण, यावेळीही योगायोग असा कि ज्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या कायम साबळेंबाबत तक्रारी असत त्यांनीच आता प्रतिष्ठा लावली आणि ज्या धनंजय मुंडेंनी थेट मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी विरोधीपक्षनेते असताना केली त्याच डॉ. साबळे यांना त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात हा मान मिळाला.

हे ही वाचा ः लसीकरणात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केले यंत्रणेचे कौतुक..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख