पैठणच्या संतपीठाचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. 

संतपीठाच्या माध्यमातून मुल्याधारीत लोकशिक्षणास चालना मिळेल. पैठण येथील उद्योग आणि रोजगार क्षेत्रासही लाभ होईल.
Paithan Santpith News Aurangagabad
Paithan Santpith News Aurangagabad

औरंगाबाद : पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते संतपीठाचे लोकार्पण होईल, (Dedication of Saint Peetha of Paithan on the occasion of Marathwada Muktisangram by the Chief Minister ) असे रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांनी सांगितले.

भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण येथील संतपीठाच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.सध्या सुरू असलेल्या विविध कामांची, इमारतीत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करत अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणीही त्यांनी समजून घेतल्या. (Minister Sandipan Bhumre, Maharashtra) त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देशही दिले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.ज्योती सूर्यवंशी, समन्वयक प्रवीण वक्ते उपस्थित होते. (Collector Sunil Chavan Aurangabad) लोकार्पणानंतर संतपीठ येथे सुरुवातीला संत साहित्य, तत्वज्ञानावर आधारित पाच परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या संतपीठाच्या माध्यमातून मुल्याधारीत लोकशिक्षणास चालना मिळेल. पैठण येथील उद्योग आणि रोजगार क्षेत्रासही लाभ होईल, असेही ते म्हणाले. पैठण येथील संतपीठ हे विद्यापीठ व्हावे, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत व्यक्त केली होती. पैठण येथील संतपीठासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

पाठपुरावा आणि वारंवारच्या प्रयत्नानंतर अखेर संतपीठ आकाराला आले असून प्रत्यक्षात ते सुरू होत आहे. पैठण ही संतांची भूमी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. संतपीठामुळे पैठण व एकूणच मराठवाड्याच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com