शिवसेनेसोबत राहिलात तर काॅंग्रेसला अच्छे दिन..

शिवसेना मेन फ्यूज आणि काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे बाजूचे फ्युज आहे. त्यामुळे मेन फ्युजला धक्का लागणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल.
Minister Abdul sattar news aurangabad
Minister Abdul sattar news aurangabad

औरंगाबाद ः शरद पवार साहेबांनी काॅंग्रेसच्या अवस्थेचे जे वर्णन केले आहे, तशीच या पक्षाची स्थिती आहे. त्यामुळे काॅंग्रेस जर सरकारसोबत आली नसती तर त्यांची आणखी बिकट अवस्था झाली असती. भविष्यात देखील काॅंग्रेसने शिवसेनाला साथ दिली तर त्यांना राज्यात अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाही, (If you stay with Shiv Sena, good day to Congress) अशा शब्दात महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काॅंग्रेसचा सूचक इशारा दिला.

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना राज्यातील अनेक विषयांना हात घातला. शरद पवार यांनी काॅंग्रेस पक्ष हा स्वतःच्या हवेलीची दुरुस्तीही करू न शकणाऱ्या जमीनदारासारखी झाली आहे, (Minister Abdul Sattar, Maharashtra) अशी टीका नुकतीच केली होती. हा संदर्भ जोडून पुर्वी काॅंग्रेसमध्ये असलेल्या सत्तार यांना विचारले असता, त्यांनी वरील विधान केले.

अब्दुल सत्तार म्हणाले, पवार साहेबांनी सांगितली अगदी तीच परिस्थीती काॅंग्रेसची आहे. ते सरकारसोबत आले नसते तर काॅंग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली असती. (Congress Maharashtra) भविष्यात देखील काॅंग्रेसला राज्यात मजबुतीने पाय रोवायचे असतील तर त्यांनी शिवसेनेसोबत राहावे, निश्चितच त्यांची राज्यात ताकद वाढेल.

शिवसेना हा राज्यातील सरकारमधाल महत्वाचा पक्ष आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर शिवसेना मेन फ्यूज आणि काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे बाजूचे फ्युज आहे. त्यामुळे मेन फ्युजला धक्का लागणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल.

कारण मेन फ्युजला धक्का लागला तर सगंळच बंद पडेल, असा टोला देखील सत्तार यांनी यावेळी आघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांना लगावला.  कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून पुन्हा एका राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. यावर राणे यांनी चार आणेच्या गोष्टी करू नये, नारायण राणे यांना स्वाभिमान पाहिजे, पण जे जळावू वृत्तीने वागत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली.

येत्या १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादेत येणार आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ते ध्वजारोहण करणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्ग मुख्यमंत्र्यांना आपण सुचवल्याचेही सत्तार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com