लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेस-भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीत.. - Congress-BJP office bearers in Latur district in NCP | Politics Marathi News - Sarkarnama

लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेस-भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीत..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

भाजपाचे बाबासाहेब गाडे पाटील व महाराष्ट्राचा महानायक विजेता मोहम्मद अयाज यांनी देखील यावेळी पक्षा प्रवेश केला.

मुंबई ः राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेस व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Congress-BJP office bearers in Latur district in NCP ) काॅंग्रेसचे माजी महापौर, भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांच्या यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थापनेला आज बावीस वर्ष पुर्ण झाले. या निमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यातील लातूरच्या काॅंग्रेस आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ( Ncp State President Jayant Patil) लातूर हा काॅंग्रेसचा गड मानला जातो. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काॅंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश महत्वाचा मानला जातो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री  अजितपवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  लातूरचे माजी महापौर अख्तर मिस्त्री, भाजप युवामोर्चाचे घनश्याम सुरेश पवार व नगरसेवक राजा मणियार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ( Mp Praful Patel)  प्रदेश सचिव संजय शेटे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला.

दरम्यान, भाजपाचे बाबासाहेब गाडे पाटील व महाराष्ट्राचा महानायक विजेता मोहम्मद अयाज यांनी देखील यावेळी पक्षा प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री  बाळासाहेब पाटील,  सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा ः शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख