शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज;अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब - Interest free loans to farmers; Cabinet seals on Ajit Pawar's announcement | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज;अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचं पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करुन देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. (Interest free loans to farmers; Cabinet seals on Ajit Pawar's announcement) त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर आता तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प उपमुख्य्मंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सभागृहात घोषणा केली होती. या घोषणेची पुर्तता मंत्रीमंडळात करण्यात आली असून अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रीमंडळ बैठकीत नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. (This is a unique gift for the farmers of the state.) महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

हे ही वाचा ः पवारांच्या लाडक्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीची अवस्था बिकट..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख