दानवेंचा काॅंग्रेसला इथेही चकवा; कार्यक्रम उधळण्याआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.. - Congress Activists in police custody before the event was disrupted. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

दानवेंचा काॅंग्रेसला इथेही चकवा; कार्यक्रम उधळण्याआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात..

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

संभाजी गुढे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांची पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्यात रवानगी केली आहे.

जालना ः केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे आज अंबड दौऱ्यावर आहेत. अंबड शहरातून त्याची मोटार सायकल रॅली आणि शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. (Congress Activists in police custody before the event was disrupted ) पण हा कार्यक्रम काही कॉंग्रेस कार्यकर्ते उधळून लावण्याच्या तयारीत होते.

याची कुणकुण लागताच पोलिसांनी एका हॉटेल मधून या कार्यकर्त्यां ताब्यात घेतले आहे. राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहीर असलेल्या दानवेंनी आज पुन्हा काॅंग्रेसला चकवा दिल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केल्यापासून रावसाहेब दानवे वादात सापडले आहेत. काॅंग्रेसने ठिकठिकाणी दानवे यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. (Central State Railway Minister Raosaheb Danve) दानवे यांच्या विरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचे नियोजन देखील काॅंग्रेसकडून सुरू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून अंबड येथील दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत असलेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेताच कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी  केली.  संभाजी गुढे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांची पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्यात रवानगी केली आहे. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान बदनापूर येथील कार्यक्रमात  रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतानांच राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.

त्यांची तुलना गावात फिरणाऱ्या मोकाट सांडाशी करून ते कोणत्याच कामाचे नसल्याचे म्हटले होते.  दानवे यांच्या या विधानानंतर  जिल्ह्यासह राज्यात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

हे ही वाचा ः जनगणना करायला पंतप्रधान तयार होतील, ओबीसींचे प्रश्न सुटतील..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख