जनगणना करायला पंतप्रधान तयार होतील ; ओबीसींचे प्रश्न  सुटतील 

गृहमंत्र्यांनी देशात जनगणना होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
3034Sarkarnama_20Banner_20_202021_05_13T145602.918.jpg
3034Sarkarnama_20Banner_20_202021_05_13T145602.918.jpg

मुंबई : ''देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील,'' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत. यावर नवाब मलिक बोलत होते.  

संसदेच्या पटलावर गृहमंत्र्यांनी देशात जनगणना होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जर देशातून मागणी असेल तर इम्पिरिकल डेटा गोळा करायला मदत होईल. शिवाय ओबीसींचे अनेक प्रश्न त्यामुळे सुटतील असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या सरकारनेसुध्दा जातनिहाय जनगणना करण्याचे सुचवले होते, याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

देशभरामध्ये एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे,'' याचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumarयांनी केला आहे.  नितीशकुमार आज (ता. २३ ) पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modiयांची भेट घेणार आहे. जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा ते गेल्या काही दिवासांपासून मांडत आहेत. काल पुन्हा एकदा त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला.

पुढील वर्षी सात राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पाहता जातीनिहाय जनगणनेची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नितीश कुमार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की जर ही चर्चा यशस्वी झाली तर ते खूप चांगले आहे, अन्यथा ते बिहारमध्ये जाती निहाय जनगणना करतील. जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी पंतप्रधानांना भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये दहा जणांचा समावेश आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री विजय चौधरी, जनक राम, ‘हम’चे अध्यक्ष जीतनराम मांझी, ‘व्हीआयपी’चे अध्यक्ष मुकेश साहनी हेही असतील. त्यांच्याबरोबर तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही असतील. काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांचाही समावेश या शिष्टमंडळात असणार आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com