पाणीपुरवठा योजनेचे काम वेळत पुर्ण करा; समांतर सारखा हलगर्जीपणा चालणार नाही.. - Complete the city's water supply scheme on time; Parallel negligence will not work. | Politics Marathi News - Sarkarnama

पाणीपुरवठा योजनेचे काम वेळत पुर्ण करा; समांतर सारखा हलगर्जीपणा चालणार नाही..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तो तात्काळ सोडविण्यासाठी मी रात्रंदिवस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

औरंगाबाद : शहरासाठी मंजुर झालेल्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पारदर्शकपणे व वेळेआधी पुर्ण करा, अशा सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या. (Mp Imtiaz Jalil Reviwe Meeting With Maharashtra Jeevan Pradikarn Officers For Water project) या योजनेची गत संमातर सारखी झाली तर कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पाणीपुरवठा योजने संदर्भात महाराषष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता अजय सिंह व इतर अधिकाऱ्यांसोबत इम्तियाज जलील यांनी आज सुभेदारी विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. (Water Scheme for Aurangabad City)औरंगाबाद शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत १६८० कोटीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 

या बैठकीत इम्तियाज जलील म्हणाले,  योजनेचा उद्भव हा जायकवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित विभागाकडून काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल. ( I Will Saport For Water Scheme Speedy Work) सदरील महत्वपुर्ण योजनेचे काम पुर्ण करत असतांना कोणत्याही स्तरावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तो तात्काळ सोडविण्यासाठी मी रात्रंदिवस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

यापुर्वीच्या समांतर जलवाहिनीतील भ्रष्टाचार पाहता सदरील योजना महानगरपालिका ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे राबविण्यात यावी, यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न केले. औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील यावर भर दिला . त्यानंतर शासनस्तरावर तशी मंजुरी मिळाल्याची आठवण देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी करून दिली. 

योजना रखडू देणार नाही..

ही योजना औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिने अतिशय महत्वाची असल्याने योजनेचे काम पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या व गुणवत्तापुर्वक काम करावे. जेणेकरुन नागरीकांना मुबलक व सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकेल. शकतो. (Municipal Corporation Financial Condision Poor) या योजनेचे काम पुर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला आपला वाटा सुमारे ३०० कोटी द्यावे लागणार आहेत. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे सदरील योजना रखडू शकते, अशी शंका देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या वाट्याला येणारी रक्कम अमृत योजनेतंर्गत प्रस्तावित करण्यात यावी. अमृत योजनेत समाविष्ठ करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव खात्यामार्फत तयार करून द्यावा, तो  केंद्र शासनाकडून  मंजुर करून आणतो, अशी ग्वाही देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यापुर्वी शासनाने समांतर जलवाहिनीला परवानगी देवून निधी दिला होता.

समांतर योजना पुर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली  होती परंतु ती योजना पुर्ण होण्याअगोदरच अनेक त्रुटी व भ्रष्टाचारामुळे न्यायप्रविष्ट होवून बासनात गेली. त्यासोबतच औरंगाबादकरांच्या स्वप्नावर पाणी फिरले गेले.  त्यामुळे दरील योजना राबविण्यात हलगर्जीपणा, दिरंगाई केल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची गय करणार नाही, अशा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : भाजपने क्रेडिट घ्यावे, पण केंद्राकडून आरक्षण द्यावे

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख