भाजपने क्रेडिट घ्यावे, पण केंद्राकडून आरक्षण द्यावे  - BJP should take credit, but give reservation from the central Government | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने क्रेडिट घ्यावे, पण केंद्राकडून आरक्षण द्यावे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

औरंगाबाद ः सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निकाल दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा संघटना, नेते संतप्त झालेले असतांनाच सत्ताधारी विरुद्ध भाजप असा संघर्ष देखील चांगला पेटला आहे. कोरोनामुळे मराठा समाजाने शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात आले असले तरी मराठा आरक्षण नाकारल्याची धग आणि संताप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. भाजपने क्रेडिट घ्यावे, पण केंद्राकडून आरक्षण द्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

औरंगाबाद ः सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निकाल दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ( Ashok Chavan Syas Bjp Get credit But Gave Maratha Reservation From Central Government)  मराठा संघटना, नेते संतप्त झालेले असतांनाच सत्ताधारी विरुद्ध भाजप असा संघर्ष देखील चांगला पेटला आहे. कोरोनामुळे मराठा समाजाने शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात आले असले तरी मराठा आरक्षण नाकारल्याची धग आणि संताप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. भाजपने क्रेडिट घ्यावे, पण केंद्राकडून आरक्षण द्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

शिवाय राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिथवणीचे काम सुरू असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. जे कुणी चिथावणी देण्याचे काम करत असतील त्यांना फडणवीसांनी सांगावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकल्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यासह अन्य विषयावर सरकारची भूमिका मांडतांना अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय अजून संपलेला नाही. ( Maratha Reservation issu not Ended )परंतू विरोधकांकडून याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकीय फायद्यासाठी चुकीची विधाने करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असून तो वेळीच रोखला पाहिजे.

निवडणुकीत फायदा व्हावा, म्हणून दिशाभूल

(Bjp Leader Devendra Fadanvis) राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. आम्ही विरोधी पक्षात असतांना त्याला पाठिंबा दर्शवून तुमच्या सोबत येण्याची तयारी दाखवली होती. पण विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून आरक्षण जाहीर करून भाजपने मराठा समाजाची  दिशाभूल केली, असा आरोप करतांनाच केंद्राच्या एका भूमिकेने राज्याला अधिकार राहिले नाहीत हे मी संभागृहात मांडले होते याची आठवणही चव्हाण यांनी करून दिली.

परंतु कायदेशीर मुद्यावर न बोलता या विषयाचे राजकारण केले जात आहे. आता राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्राने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाला चिथावणी देण्याचे काम केले जात असून समाजाने त्याला बळी पडू नये असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.

ही बातमी पण वाचा ः रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, अ्न देशमुखांवर टांगती तलवार

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख